सात वर्षे जेल यातना भोगल्यानंतर 'तो' झाला निर्दोष, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
Kalyan Crime News Marathi: नाशिकमध्ये राहणारा सहदेव ढगे हा कॅटरिंगचे काम करीत होता. याचदरम्यान सहदेवची एका महिलेसोबत ओळख झाली. ती महिला सहदेवला मुलगा मानत होती. सहदेवने महिलेच्या कुटुंबियांना अनेकदा मदत केली. नंतर या महिलेचे कुटुंब बदलापूर येथे राहण्यास आले. एका दिवशी सहदेव त्यांना भेटण्यासाठी आला. त्यावेळी महिलेच्या मुलीने तिच्यावर सहदेवने प्राणघातक हल्ला करुन बलात्कार केल्याचा आरोप केला. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बदलापूर पोलिसांनी सहदेवला अटक केली. अटकेनंतर त्याला जामीन मिळाला नाही. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याने तो सात वर्षापासून कारागृहात होता. सहदेव शेतकरी कुटुंबांतील असल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. तरी पण कुटुंबियांचा संघर्ष सुरु होते.
आई त्याला मुलगा मानत होती. तिची मुलगी त्याला भाऊ मानत होती. मात्र मुलीनेच सहदेव रामचंद्र ढगे नावाच्या या तरुणावर बलात्का रकेल्याचा आरोप केला होता.तिच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बदलापूर पोलिसांनी सहदेवला अटक केली. सात वर्षे तो तुरुंगात होता. आणि आत्ता त्याला कल्याण न्यायालयाने त्याची या आरोपातून निर्देाष मुक्तता केली आहे. सात वर्ष सहदेव न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे.
सहदेवच्या बाजूने एडवोकेट विलास पाटील आणि एडवोकेट प्रियेश सिंह न्यायालयात बाजू मांडली. अखेर कल्याण न्यायालयात खटला उभा राहिला. या प्रकरणाल कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. इनामदार यांच्याकडे होते. या प्रकरणात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने सहदेवची निर्दोष मुक्तता केली आहे. या बाबत एडवोकेट प्रियेश सिंह यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने न्यायालयासमोर घटनेची जी माहिती दिली होती. ती माहिती आणि पोलिस जबाब यामध्ये तफावत होती. ती जेव्हा घटनेच्या दिवशी जखमी झाली होती. या प्रकरणी पुरावा नव्हता. अखेर सहदेवची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्याला सात वर्षे सहदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी जी यातना भोगली त्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.