एका फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग...; मुंबईच्या रस्त्यावर परदेशी महिलेसोबत गैरवर्तन; संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
अतिथी देवो भव अर्थात पाहुणा हा देवासारखा असतो, ही भारताची ओळख गेल्या अनेक शतकांपासून आहे. परंतु काही लोक या ओळखीला काळीमा फासतात. सध्या मुंबईत अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक परदेशी महिला भारत भ्रमंतीसाठी आली होती. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर तिच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. या परदेशी महिलेने सोशल मीडियावर तिचा थरारक अनुभव शेअर करत भारतात तिच्यासोबत पहिल्यांदाच असे घडले असल्याचे म्हटले आहे.
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरत असताना दोन तरुणांनी तिचा जवळपास १५ मिनिटे पाठलाग केला आहे. त्याला परदेशी महिलेसोबत फोटो, सेल्फी हवी होती. परंतु परदेशी महिलेने नकार देऊनही तो तिचा पाठलाग करत राहिला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण महिलेच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी महिलेने वारंवार शांत राहून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तरुण मागे हटायला तयार नाही. महिलेच्या चेहऱ्यावरुन तिची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. महिला स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत मात्र तरुण कोणतेही लाज न बाळगता तिला त्रास देत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ परदेशी महिलेने तिच्या इन्स्टाग्राम @lost.with.ines अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांंची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी तरुणांच्या गैरकृत्यासाठी परदेशी महिलेची माफी मागितली आहे. मात्र या घटनेने देशातील आणि परदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकांनी पाठलाग करणाऱ्या संबंधित तरुणांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






