हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक (फोटो- ट्विटर)
काही दिवसांपूर्वी हरयाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज दोन्ही राज्यांचे निकाल समोर आले आहेत. हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान हरयाणाची निवडणूक अनेक पक्षांमध्ये पार पडली. कारण भाजप, कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाने देखील हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक लढवली. संध्याकाळपर्यंत बरेचसे चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या असलेल्या स्थितीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निकालांवर बोलताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ” कोणत्याही निवडणुकीला सहजतेने घेऊ नये. अतिआत्मविश्वास असू नये हीच मोठी शिकवण आजच्या निवडणुकीतून शिकण्यासारखी आहे. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक जागा जिंकणे हे कठीण असते. अंतर्गत लढाई असून चालणार नाही.”
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “जनतेला चांगल्या प्रकारे कामे व्हावीत ही अपेक्षा असते. त्या दृष्टीने विचार करून निवडणूक लढल्यास निवडणूक नक्कीच जिंकू. निवडणूक जिंकणे हेच आपले मुख्य ध्येय असले पाहिजे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे खाते उघडले आहे. अशा प्रकारे पाचव्या राज्यात आम आदमी पक्षाचे खाते उघडले आहे.”
डोडा से आम आदमी पार्टी के उम्मीदवार मेहराज मलिक द्वारा बीजेपी को हराकर शानदार जीत हासिल करने के लिए बहुत बहुत बधाई। आप बहुत अच्छा चुनाव लड़े।
पांचवें राज्य में MLA बनने पर पूरी आम आदमी पार्टी को बधाई।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 8, 2024
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच आम आदमी पक्षाने देखील जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत डोडा मतदारसंघातून आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे देशातील पाचव्या राज्यात आम आदमी पक्षाने खाते उघडले आहे.