कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
हरयाणामध्ये आज 5 ऑक्टोबरला मतदान पार पडले आणि आता वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि सर्वेक्षण एजन्सी यांच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत हरियाणामध्ये भाजपला नामोहरम केले आहे असे दिसत आहे.
आज हरयाणामध्ये 90 जागाकरिता मतदान झाले. या 90 जागांसाठी 1031 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. मतदानासाठी 20,632 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीचे निकाल हे 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान हरियाणामध्ये रिपोर्टनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत हरयाणात 65 टक्के मतदान झाले होते.
एक्झिट पोल ( Exit Polls)
दैनिक भास्कर – कॉंग्रेस 44 ते 54 जागा, भाजप 15-29, जेजेपी 0-1, आप 0-1 आणि इतर 4-9
पिपल्स पल्स- कॉंग्रेस 49-61, भाजप 20-32, जेजेपी 0-1, आप 2-3 आणि इतर 3-5
ध्रुव रिर्सच- कॉंग्रेस 50-64, भाजप 22-32, जेजेपी 0, आप 0 आणि इतर 2-8
पी मार्क ( P Marq)- कॉंग्रेस 51-61, भाजप 27-35, जेजेपी 0, आप 3-6 आणि इतर 0
या सर्व एक्झिट पोलनुसार दिसते की भाजपची हरियाणामधून एक्झिट होणार आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणूकीतही कॉंग्रेसने हरियाणामध्ये पुनरागमन करत 5 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेसला विधानसभा निवडणूकीमध्ये यश मिळू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत होते आता एक्झिट पोलवरुन तरी कॉंग्रेसला घवघवीत यश मिळत असल्याचे दिसत आहे. 2019 ला भाजप आणि जेजेपीने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपचे 40, जेजेपीचे 10, कॉंग्रेस 31 अशा जागा आल्या होत्या मात्र यावेळी भाजप आणि जेजेपी वेगळे लढत आहेत.
भाजपसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जोरदार प्रचार केला होता. कॉंग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या होत्या. एक्झिट पोलनुसार तरी राहुल, प्रियांका हे वरचढ ठरले आहेत. आता 8 ऑक्टोबरला नेमका निकाल कळणार आहे.