Photo Credit- Social Media महापालिका निवडणुकीसाठी संदीप देशपांडेंसह अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून यामध्ये महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे. यंदाचा निकाल अत्यंत धक्कादायक असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला मात्र एकही जागा मिळालेली नाही. राज ठाकरे यांच्या झंझावती प्रचार व सभांनंतर देखील मनसेला एकही आमदार मिळालेला नाही. यानंतर आता राज ठाकरे यांनी बैठक घेतली असून यावेळी पदाधिकारी व उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निराशाजनक पराभवानंतर मनसे पक्षाने बैठक घेतली होती. राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उमेदवार देखील उपस्थित होते. अगदी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील माहिम मतदारसंघामध्ये पराभव झाला. यावरुन सर्व नेत्यांमध्ये व राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नेत्यांनी ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच राज ठाकरे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी थेट कारण सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाणे महागात पडले. भाजपसोबत जाणं ही चूक ठरली असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
मनसे पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. इतर कोणत्याही पक्षांपेक्षा आपण जास्त जागा लढवणार आहोत आणि निवडणुकीनंतर आपण सत्तेमध्ये असणार आहोत असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मनसेला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे मनसे पक्षाचा हिरमोड झालेला आहे. निकालानंतर राज ठाकरे यांनी अवघ्या काही शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय…तूर्तास तरी एवढंच, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनसे पक्षावर निवडणूक आयोगाच्या कारवाईची देखील टांगती तलवार आहे. निवडणुकीमधील त्यांची कामगिरी अगदीच सुमार ठरली. पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. ‘एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा आणि तीन मतदान मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे,’ असं अनंत कळसे म्हणाले.