नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक निकाल 2024 समोर आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून राज्यभरातील मतमोडणीला सुरुवात झाली आहे. आता राज्यामध्ये सध्या तरी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महायुतीकडे सध्या 207 जागांचे लीड आहे. तर महाविकास आघाडीकडे फक्त 70 हून अधिक जागांचे आघाडी दाखवण्यात येत आहे. मात्र हे चित्र कधीही बदलू शकते. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
नागपूरमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र भाजप आणि काँग्रेसशिवाय बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र श्रावण डोंगरे यांचाही मोठ्या नावांमध्ये समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे डॉ आशिष देशमुख यांचा 49 हजार 344 मतांनी पराभव केला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे. फडणवीस यांना 13 हजारांहून अधिक मते सध्याच्या मतमोजणीनंतर पडली आहे. फडणवीस हे 6 हजार हून अधिक मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना केवळ 6 हजार मते पडली असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. मतमोजणीच्या पूर्ण फेऱ्या होण्याचे अद्याप बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजप नेत्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जोरदार प्रचार
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. मागील दीड महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने प्रचाराचा धुराळा उडवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या प्रचारासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. देवेंद्र फडणीवस यांनी मागील महिन्याभरामध्ये 25 जिल्ह्यांमध्ये प्रचार केला असून 64 हून अधिक जाहीर सभा आणि रॅली घेतल्या आहेत. त्यामुळे आता निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षश्रेष्ठी कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता लागली आहे.