शरद पवार, छगन भुजबळ एकाच मंचावर, हास्यसंवाद, चर्चा अन् बरचं काही
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. युती म्हणून पहिल्यांदाच महायुती व महाविकास आघाडी एकत्रित विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे दोन्ही युतींसाठी ही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये देखील वादंग निर्माण झाला आहे. अहिल्यानगरच्या प्रचारसभेमध्ये शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा देखील खरपूस समाचार घेतला.
महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते शरद पवार यांची अहिल्यानगर येथील राहुरीमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी पक्ष फोडण्यावरुन आणि पक्षांतरावरुन खोचक टोला लगावला आहे. शरद पवार प्रचारसभेमध्ये म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले.ज्या महाराष्ट्रात कॉंग्रेसचा 1 खासदार, राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. तुम्ही आम्हाला 48 पैकी 31 खासदार दिले, राष्ट्रवादीला 8 खासदार दिले. लोकसभेच्या निकालानंतर त्यांची चिंता वाढली,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुढे शरद पवार म्हणाले की, “आता आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, असा घणाघात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली
पुढे शरद पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशात आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. 400 पारचा डाव उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी काही योजना राबवल्या. मात्र आज महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता. आज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 1100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पीकाला भाव मिळाला नाही. शेतकऱ्याने घटाघटा विष पिलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही”, असा गंभीर शब्दांमध्ये शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.