Omraje Nimbalkar Targets Ajit Pawar In Madha Assembly Constituency
पंतप्रधान कोट्यवधींचा घोटाळ अन् कारवाई म्हणत असताना उपमुख्यमंत्री केलं…; ओमराजे निंबाळकर यांचा एल्गार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु आहे. सोलापूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर सभेमध्ये अजित पवारांवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
पंढरपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. त्यामुळे नेत्यांचे आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “पंतप्रधानांनी अजित पवार यांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं. 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांवर जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपा सदबुद्धीने कारवाई करत आहे. पक्ष फोडीचे राजकारण केले. मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना लाठी चार्ज केला. आता ते म्हणतात ‘बटेंगे तो कटेंगे’ याला माझे एकच उत्तर आहे. ‘जुडेंगे तो जितेंगे’ असे म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान असताना ‘हिंदू खतरे में’ असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीएसटी लावला जातो. मात्र धन दांडग्यांना सूट दिली जाते. शेतमालाला भाव मिळत नाही असा सवाल उपस्थित केला.
यावेळी त्यांनी मतदार उमेदवारांची तुलना करत असतो दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना शेवटच्या घटका मजत असताना तो चांगल्या पद्धतीने सुरू करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला. कोरोनाच्या महामारीत आर्थिक नुकसान करून नागरिकांचा जीव वाचवला हीच पुण्याई त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अभिजीत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की; अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे पूर्ण करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आबांना उमेदवारी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रस्थापितांनी शेकडो तरुणांच्या उताऱ्यावर कर्ज काढून त्यांचे भविष्य उध्वस्त केले. त्यांच्या आश्रूंच्या हुंकरामधून आबांना उमेदवारी मिळाली आहे. पांढऱ्या शुभ्र कापडात गणेश कुलकर्णींचा मृतदेह घरी आला त्यांच्या लहान मुलांच्या हंबरड्या मधून आबांची उमेदवारी आली आहे. अशा शब्दात विद्यमान आमदार यांचा समाचार घेतला.
यावेळी माढा सकल मराठा समाज आणि जिल्हा दुध संघाचे संचालक व माढा नगरपंचायत नगरसेवक राजाभाऊ चवरे तसेच कुर्मदास साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे, अमरसिंह साठे व जामगाव विद्यमान सरपंच सोनाली हरिदास सरवदे, हरिदास नागनाथ सरवदे, बुद्रुकवाडीचे विद्यमान सरपंच पूजा गणेश माने यांनी अभिजीत पाटील यांना प्रवेश करून पाठिंबा दिला..शेकडो अनेक कार्यकर्त्यांसह अभिजीत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला.
Web Title: Omraje nimbalkar targets ajit pawar in madha assembly constituency