एसटीने मागे घेतली दरवाढ (फोटो- सोशल मीडिया)
एसटीकडून करण्यात आली होती तिकीट दरात वाढ
प्रवाशांना मोजावे लागणार होते जास्तीचे पैसे
मात्र आता लोकांची दिवाळी होणार गोड
Maharashtra Government: काल दिवाळीनिमित एसटी प्रशासनाने दिवाळीआधी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सणसुदीचा काळ आहे. त्यातच हजारो लोक दिवाळीनिमित आपापल्या गावी जात असतात. त्याच दरम्यान एसटीने तिकीट दरात 10 टक्के वाढ केली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत आदेश दिल्याचे समजते आहे.
एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता होती. ही दरवाढ दिवाळीसाठी लागू असणार होती. एसटीच्या तिकीट दरामध्ये तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र आता ही हंगामी दरवाढ रद्द करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हंगामी 10 टक्के दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.