महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी सचिन सावंत यांनी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश (फोटो - एक्स)
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. निकालासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहे. उद्या (दि.22) मतमोजणी केली जाणार असून निकाल हाती येणार आहे. महाराष्ट्राचे राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वी राजकारणाला देखील वेग आला आहे. निवडणूकीचा निकाल येण्यापूर्वी भाजपला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.
निवडणुकीचा प्रचार दीड महिना सुरु होता. यावेळी अनेक नेत्यांनी व इच्छुकांनी पक्षांतर केले आहे. निवडणुकीच्या पूर्वी अनेक नेत्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडे इनकमिंग वाढले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर देखील नेत्यांचे पक्षांतर होत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. सचिन शिंदे यांनी निकालाच्या एक दिवस आधी हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजपला देखील याचे आश्चर्य वाटत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर सचिन शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. सचिन शिंदे यांनी आता हाती मशाल घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सचिन शिंदे यांचे मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठे नाव आहे. दादर माहिम भागामध्ये सचिन शिंदे यांनी अनेक कामे केली असून विकासकामांना हातभार लावला आहे. या भागामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील आहेत. सचिन शिंदे यांनी हाती मशाल घेतल्यामुळे माहिम दादर परिसरातील राजकारण बदलले आहे. मातोश्रीवर भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
भाजप मुंबई सचिव सचिन शिंदे ह्यांनी आज मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं. ह्यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, सिनेट सदस्य प्रदिप… pic.twitter.com/SeiNoNGQEs
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 22, 2024
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहिम मतदारसंघामध्ये मोठी लढत झाली. माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. या मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिंदे गटाने उमेदवार दिला होता. शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. भाजपकडून अमित ठाकरेंसाठी ही उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्याचबरोबर पुतण्याविरोधात काका उद्धव ठाकरे यांनी देखील उमेदवार दिला होता. महेश सावंत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. आता मात्र निकालापूर्वी भाजपला माहिममध्ये धक्का बसला असून सचिन शिंदे हे ठाकरे गटामध्ये गेले आहेत.