एकनाथ शिंदे यांच्य पक्षातील यादीमध्ये अनेक घराणेशाहीच्या उमेदवारांना संधी (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : विधानसभा निवडणुकीची जोरदार धामधुम राज्यामध्ये सुरु आहे. भाजपनंतर मनसे आणि आता शिंदे गटाने उमेदावारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कोणकोणते नेते कोणाविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट होत. विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडी लढणार आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही विद्यमान मंत्र्यांसह इतर सदस्याची नावे जाहीर झाली आहे. यामुळे अनेकांच्या महत्त्वकांशेवर पाणी फिरले आहे. 45 उमेदवारांमध्ये काही घराणेशाही असल्याचे देखील दिसले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये काही विद्यमान आमदार व मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्षातील प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबियांनी देखील निवडणूकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. यामध्ये नवीन चेहऱ्यांना किंवा तरुणांना संधी देण्याऐवजी नेत्यांच्या घरांच्यांना संधी देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, एरंडोलमधूल अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले. त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाची उमेदवारी चाचपणी सुरु आहे. पण संदीपान भुमके त्यांच्या मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रवींद्र वायकर यांची सुद्धा वर्धी खासदार म्हणून दिल्लीला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावर त्यांच्याच घरातील व्यक्तीला संधी देण्यात आली. शिंदे गट व भाजपमध्ये या मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु होती. मात्र शिंदे गटाने हा मतदारसंघ आपल्याच बाजूने घेत जोगेश्वरी पूर्वमधून त्यांच्या रवींद्र वायकर पत्नीला म्हणजेच मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांच्या भावाला म्हणजेच किरण सामंत यांना राजापूरमधून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.