Photo Credit- Team Navrashtra
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी उत्सुकताही वाढू लागली आहे. राज्यात महाविकास आघाडी जिंकणार की महायुती यावर अनेक खलबतं सुरू आहेत.विशेष म्हणजे, महायुती जिंकली तर मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि महाविकास आघाडी जिंकली तर कोणाचा मुख्यमंत्री होणार, असे अनेक प्रश्न केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्यांच्या मनातही उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत.
निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहेत. काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. भाजपनेही आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जागावाटपाबाबत खलबतं सुरू आहेत, आज यावर अंतिम निर्णय़ होण्याचीही शक्यता आहे. पण या सगळ्यात एका प्रसिद्ध भविष्यकाराने महाराष्ट्राच्या पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर भाकित केलं आहे.
हेही वाचा: Baramati Politics: शरद पवारांनी डाव टाकला; बारामतीतून काका विरूद्ध पुतण्याची होणार लढत?
ज्योतिषी अनिरुद्ध कुमार यांनी 12 ऑक्टोबरला पोस्ट करून महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे. “ग्रह ताऱ्यांची स्थिती पाहता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती (एनडीए) जिंकेल” असं अनिरुद्ध कुमार यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दलही त्यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील,” असंही भाकित त्यांनी केलं आहे. ही पोस्ट करताना त्यांनी देवेद्र फडणवीस यांचा फोटोही शेअर केला आहे.
हेही वाचा: स्पॅम आणि फेक कॉल्सपासून आयफोन युजर्सची सुटका, ॲपलने घेतला महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीतही जाागावाटपासंदर्भातला तिढा सुटलेला नाही. काही जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमंध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूमधील पक्षांकडून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत असलेला वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.