Photo Credit- Social Media जनतेच्या मनातील सरकार स्थापन करणार
सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीकडे एकतर्फी बहुमत असले तरी सरकार अद्याप स्थापन करण्यात आलेले नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून तरी त्यांची गृहखाते व नागरी विकास खात्याची मागणी आहे. ही मागणी भाजपला मान्य नसल्यामुळे सरकार स्थापनेचे घोंगडे भिजत राहिले आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे हे हवामान पालटासाठी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. ऐन सरकारस्थापनेच्या काळात ते गावी गेल्यामुळे सरकार स्थापनेची प्रक्रियेला विलंब होत आहे. यामध्ये आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. हे त्यांचे मूळ गाव आहे. गृहमंत्री पदाची मागणी करूनही ती न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात शिंदे यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून सध्या ते तापाने आजारी आहे अशी माहिती समोर येत आहे. या माहितीला सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पथकाने दुजोरा दिला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महायुतीला महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असताना अद्यापही सत्ता स्थापनेची गाडी पुढे सरकलेली नाही .मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघारीचा दावा केला असला तरी महायुतीची बैठक रद्द करून ते शुक्रवारी अचानक दरे हे आपल्या गावी परतले यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली आहे त्यावर ते ठाम असून ते न मिळाल्याची त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्यक्षात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कोणालाही न भेटणे टाळले आहे त्यांचे सहकारी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्यांच्या भेटीसाठी दरे गावी आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणावरून त्यांची भेट होऊ शकली नाही ते तातडीने मुंबईला रवाना झाले . काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी डॉक्टरांचे एक पथक दरे गावी रवाना झाले आहेत डॉक्टरांनी शिंदे यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या घशाला इन्फेक्शन आणि ताप असल्याचे सांगितले आहे गेल्या काही दिवसापासून त्यांना सर्दीचा त्रास सुरू होता दरे येथील गावी ते आरामासाठी आल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र ते नाराज असल्याच्या शक्यतांनी जोर धरला होता मुख्यमंत्र्यांना सध्या दोन दिवस आरामाची गरज आहे त्यानंतरच पुढील काय तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे