पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अजिबात करू नका 'या' पदार्थांचे सेवन, रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच वाढेल अपचनाचा त्रास
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळे उपलब्ध होतात. पण त्यातील काही फळे शरीरासाठी चांगली असतात तर काहींचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते आणि शरीराला साथीच्या आजारांची लागण होण्याची खूप जास्त शक्यता असते. कारण या दिवसांमध्ये दमट वातावरणात विषाणू झपाट्याने वाढतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे पचनक्रिया बिघडते. जुलाब, उलट्या, ऍसिडिटी तर काहीवेळा डेंग्यू, मलेरियासारखे आजार सुद्धा होतात. त्यामुळे विकतचे किंवा उघड्यावर मिळणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मासे खाऊ नये. कारण हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांमध्ये विकले जाणारे मासे बर्फात साठवून ठेवले जातात. बर्फातील किंवा शिळ्या माशांच्या सेवनामुळे पोटाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर माशांचे अजिबात सेवन करू नये. मासे आणि दुधापासून बनवलेले पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे तीव्र ऍलर्जी किंवा पचनक्रिया बिघडून पोटाचे विकार होऊ शकतात.
दही खायला सगळ्याच खूप जास्त आवडते. दह्यात असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारतात. पण अनेकांना दह्यासोबत फळे खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. कारण दही आणि आंबट फळांमध्ये असलेले घटक एकत्र मिक्स होतात, ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो.यामुळे पोटात ॲसिडिटी वाढते, गॅस होतो आणि पावसाळ्यात चयापचय क्रिया मंदावते. तसेच थंड वातवरणात आंबट फळे खाल्ल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.
Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
पावसाळ्यात सगळ्यांचं कांदाभजी आणि गरमागरम चहा पिण्याची खूप जास्त इच्छा होते. गरमागरम चहा आणि कांदाभजी हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे असेल तरीसुद्धा यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. चहामध्ये टॅनिक ॲसिड आणि तळलेल्या पदार्थांमध्ये बेसन आणि तेल असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र पोटात गेल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
Ans: तळलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, कच्ची पालेभाजी, जास्त मसालेदार पदार्थ आणि जास्त काळ बाहेर ठेवलेले अन्न टाळावे.
Ans: या काळात आर्द्रता वाढल्याने पचनक्रिया मंदावू शकते आणि दूषित अन्नामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
Ans: ताजे आणि गरम अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, हंगामी फळे खावीत आणि संतुलित आहार घ्यावा.






