NEET-UG 2026 परीक्षेतील घोटाळा, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात अहिल्यानगरमध्ये आज विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या धडक मोर्चात हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, डॉक्टर आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारणारच,” असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी या वेळी घेतला.