वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ (Photo Credit- X)
वाशिममधील एका संवाद सत्रात बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महिलांना आर्थिक आधार देत आहे. त्यांच्या मते, योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होताच महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात, असं विधान आदिती टकरे यांनी केलं आहे. त्या वाशिम येथील अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होत्या.आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम? आदिती तटकरेंच्या वक्तव्याची चर्चा | NDTV मराठी#AditiTatkare #LadkiBahinYojana #MaharashtraPolitics #NCP #MaharashtraNews #ndtvmarathi pic.twitter.com/8VwiqcraHI — NDTV Marathi (@NDTVMarathi) July 26, 2026
अदिती तटकरे यांच्या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. महिलांविषयी केलेले हे विधान अयोग्य असल्याचे सांगत विरोधी पक्ष सरकारवर टीका करू शकतात. दुसरीकडे, महिलांची वाढलेली खरेदीशक्ती आणि स्थानिक अर्थव्यवस्था व बाजारपेठांवर या योजनेचा झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्याचा मंत्र्यांचा उद्देश होता, अशी भूमिका सरकारकडून मांडली जाऊ शकते.
दरम्यान, या योजनेअंतर्गत ई-केवायसीसाठी सरकारने निश्चित केलेली मुदत संपली होती, ज्यामुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. अशा महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे: ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, ती पुढील सहा महिन्यांत पूर्ण करता येईल.






