फोटो सौजन्य - Social Media
सिनेमा 98.70 कोटींवर आला आहे म्हणजेच फक्त 1.30 कोटींच्या वाढीने हा सिनेमा 100 कोटीच्या घरात पाऊल ठेवेल. सिनेमाबद्दल आणखीन एक विशेष म्हणजे सिनेमा आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांचा एकमेकांशी संबंध आला आहे. सिनेमाचा DTP तयार करण्यामध्ये शाहरुख खानने फार मोठे योगदान दिले आहे. 42 लाखांवर येणारा खरंच शाहरुखच्या सहकार्यामुळे त्यावर 40 ते 50% सूट मिळाली आहे, ही बाब स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेने सांगितली आहे.
सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल म्हणून मराठी सिनेविश्वातील अनेक दिगदर्शक तसेच अभिनेत्यांनी प्रवीण तरडेला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता किरण गायकवाडने भली मोठी पोस्ट करत प्रवीण तरडेसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच देऊळबंद 2 च्या यशासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी देखील प्रवीण तरडेसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. सिनेमाने पाच आठवड्यात 90.50 कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तसेच इतर देशातून आजवर 6.10 कोटींची कमाई केली आणि तंबू शोने 2.10 कोटींचा आकडा गाठला आहे.
सिनेमा जरी 100 कोटींचा पार होणार असला तरी दिगदर्शक प्रवीण तरडे याने स्पष्ट केले आहे की ‘माझा सिनेमाने राजा शिवाजी सिनेमाला मात करू नये. कारण तो छत्रपतींवर बनवलेला सिनेमा आहे.’ राजा शिवाजी सिनेमाने एकूण 130 कोटींची कमाई केली आहे.






