(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा तो आणि त्याची पत्नी संजना चव्हाण, दोघे जोडीने चर्चेत आले आहेत. दोघांनी हे अधिकृत रित्या काही सांगितले नसले, तरी सध्या सोशल मीडियावर त्याची पत्नी संजनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या आधी संजनाचा एक व्हिडिओ व्हारल झाला होता ज्यामुळे असं समजले होते की ती लवकरच आई होणार आहे. पण आता संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे की सुरज चव्हाणच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे. फोटो आणि व्हिडिओ जरी सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी या दोघांनी अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही.
बिग बॉस फेम सुरज चव्हाणची पत्नी संजनाने तिच्या @official_sanjana_suraj_1151 या सोशल मीडिया हॅण्डलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये संजनाने सुंदर असा लुक केला आहे. साडी, नाकात नथनी असा मराठमोळा लुक तिने केला आहे. या फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. संजना आणि सुरज, लवकरच पालक होणार आहेत, असे स्पष्ट संकेत या चर्चेत असणाऱ्या व्हिडिओ आणि फोट मधून मिळत आहेत.
‘भुल भुलैय्या’ नाटकातून रहस्य, थरार आणि भ्रमाचा अनोखा खेळ; Priya Berde चं रंगभूमीवर दमदार पुनरागमन
संजनाने बेबी बंपसोबतचा फोटो पोस्ट करत कमेंट सेक्शन बंद केले आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने केवळ ब्लू आय, हार्ट आणि प्रेग्नेंट महिलेचं इमोजी शेअर केल आहे. त्यामुळे अनेकांना तिच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचं आगमन होणार असल्याचे वाटत आहे.






