हरयाणाचा मयंक केबीसी ज्युनियरमध्ये ठरला करोडपती, १३ वर्षाच्या आठवीच्या विद्यार्थ्याची कमाल, हरियाणाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

मयंक हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहे. मयंक १२ वर्षांचा असून तो आठवीत शिकतो.

    हरियाणाच्या महेंद्रगढमधील पाली गावातील 8वीत शिकणारा मयंक हा KBC ज्युनियरमध्ये उत्तर भारतातील पहिला करोडपती (Kaun Banega Crorepati 15) बनला आहे. त्याने आपल्या प्रतिभेने अमिताभलाही थक्क केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनीही फोनवर बोलून मयंक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. मयंकचे वडील प्रदीप कुमार दिल्ली पोलिसात हवालदार आहेत, तर आई बबिता गृहिणी आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आज पाली गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    एक कोटी जिंकणारा मयंक कोण आहे?

    मयंक हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहे. मयंक १२ वर्षांचा असून तो आठवीत शिकतो. मयंकचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत. मयंकचं ज्ञान पाहून अमिताभ बच्चन देखील थक्क झाले आहेत. ज्ञान हीच गोष्ट महत्त्वाची आहे, असे मयंकचे मत आहे.

    मयंकचे हे ज्ञान पाहून अमिताभ बच्चन झाले थक्क

    शो दरम्यान मयंककडे बघून अमिताभ बच्चन त्याला म्हणाले की, तुला इतकं सगळ ज्ञान आहे. कुठे वाचतोस हे सगळं.  अमिताभ यांनी मयंकच्या आईवडिलांना विचारलं की त्याला एवढे ज्ञान कुठून मिळाले. तर मयंकचे वडील म्हणतात- सर, त्याचे शिक्षकही काळजीत आहेत. दोन दिवसांनी काय शिकवले जाईल हे तो आधीच विचारतो.