Maharashtra Breaking News Updates Today:
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सतत चढऊतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होत आहे, तर कधी चांदीचे दर खाली कोसळत आहेत. आज भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
भारतात 22 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,528 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,234 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,646 रुपये आहे. भारतात 22 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,55,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,16,460 रुपये आहे. भारतात 22 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 264.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,64,900 रुपये आहे.
22 Apr 2026 05:52 PM (IST)
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून (एक्स्प्रेस वे) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्ती व रंगकामाच्या कामासाठी 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रत्येकी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून देण्यात आली आहे.
22 Apr 2026 05:34 PM (IST)
अबुधाबी : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) तिजोरीपर्यंत पोहोचली आहे. आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी यूएईने अमेरिकेला इशारा दिला की, डॉलरच्या – स्वरूपात मदत मिळाली नाही, तर नाईलाजास्तव तेलाच्या व्यापारासाठी चिनी चलन ‘युआन’चा रस्ता धरावा लागेल. इराणसोबतचा हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास तेलातून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे ठप्प होईल, अशी भीती यूएईला वाटत आहे. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे अमिरातीचे तेलवाहू टैंकर बाहेर पडू शकत नाहीत. तेल आणि गॅसची विक्री न झाल्यास देशात डॉलर येणार नाहीत.
22 Apr 2026 05:21 PM (IST)
भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात Tesla ने नवी खेळी खेळली आहे. कंपनीने Tesla Model Y चे Model Y L हे नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केले असून याची एक्स-शोरूम किंमत 61.99 लाख रुपये आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीकडून या नवीन कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
22 Apr 2026 05:08 PM (IST)
नेपाळ (Nepal) च्या नव्या राजकारणा मोठी उलथापालथ सरु आहे. अवघ्या तीन आठवड्यातच सत्तेवर आलेल्या बालेन शाह सरकारला मोठा धक्का बसला आहे. नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बालेन शाह सरकारची स्थिरता धोक्यात आली आहे.
22 Apr 2026 04:50 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनेच महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. पिस्तूलच्या साहाय्याने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 Apr 2026 04:40 PM (IST)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केल्यामुळे भारतीय राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाला प्रत्युत्तर देताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. फडणवीस यांनी काँग्रेसने वापरलेली ही भाषा म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
22 Apr 2026 04:35 PM (IST)
धाराशिव तालुक्यात मंगळवारी, २१ एप्रिल रोजी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
22 Apr 2026 04:30 PM (IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अजून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ई-निरसन प्रणालीचे ‘उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.
22 Apr 2026 04:20 PM (IST)
जागतिक व्यापाराचा श्वास रोखून धरण्याची ताकद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आता इराणचा अधिकृत ‘टोल नाका’ सुरू होणार आहे. इराणच्या संसदेने एक असा १२-कलमी ऐतिहासिक आणि वादग्रस्त मसुदा तयार केला आहे, जो जागतिक सागरी सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकेल. या नव्या नियमांमुळे इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, इराणने आता समुद्रातही आपली लष्करी आणि कायदेशीर ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
22 Apr 2026 04:15 PM (IST)
स्मार्टफोनची चिप असो किंवा अत्याधुनिक फायटर जेट यांसारठी रेअर अर्थ खनिजांशिवाय डिजिटल युगात प्रगती अशक्यच आहे. आतापर्यंत या क्षेत्रावर जवळपास चीन(China) चे ९०% वर्चस्व होते. याचा वापार करुन चीनने संपूर्ण जगाला धमकावून ठेवले होते. आता मात्र चीनच्या या दादागिरीला चागला चाप बसणार आहे. भारताचा शेजारी देश मलेशियाने मोठ्या प्रमामावर रेअर अर्थ उत्खनन आणि शुद्धीकरण सुरु केले आहे.
22 Apr 2026 04:08 PM (IST)
राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (22 एप्रिल 2026) पार पडली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिक्षकांचे वेतन, आयटी पार्क इत्यादींशी संबंधित निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर, सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, श्रेणी-स्तरीय धोरणाची तरतूद केली आहे.
22 Apr 2026 03:50 PM (IST)
नीता परब, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अजून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ई-निरसन प्रणालीचे ‘उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.
22 Apr 2026 03:42 PM (IST)
Iran 12-point resolution Hormuz 2026 : जागतिक व्यापाराचा श्वास रोखून धरण्याची ताकद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आता इराणचा अधिकृत ‘टोल नाका’ सुरू होणार आहे. इराणच्या संसदेने एक असा १२-कलमी ऐतिहासिक आणि वादग्रस्त मसुदा तयार केला आहे, जो जागतिक सागरी सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकेल. या नव्या नियमांमुळे इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, इराणने आता समुद्रातही आपली लष्करी आणि कायदेशीर ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
22 Apr 2026 03:30 PM (IST)
हतनूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा कन्नड येथील पर्यायी केंद्रांवर सुरळीत पार पडली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुवारी परीक्षा विभागाकडे सादर करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉम. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा गंभीर प्रकार कन्नड तालुक्यातील हतनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात उघडकीस आला होता. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कठोर भूमिका घेत संबंधित परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत.
22 Apr 2026 03:20 PM (IST)
Rajnath Singh statement Iran US war : पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील रक्तरंजित संघर्षाने आता एका अत्यंत संवेदनशील वळणावर प्रवेश केला आहे. या युद्धाच्या ज्वाळा शांत करण्यासाठी जगभरातील मोठे देश प्रयत्न करत असतानाच, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीच्या भूमीवरून एक असे विधान केले आहे, ज्याने जागतिक राजकारणात भारताच्या वाढत्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. “आम्ही प्रयत्न केले आहेत आणि कदाचित उद्या ती वेळ येईल जेव्हा भारत या संकटात यशस्वी मध्यस्थ म्हणून समोर येईल,” या सिंह यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
22 Apr 2026 03:10 PM (IST)
Worli Dome Viral Video : मुंबई : लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) नामंजूर झाल्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. देशव्यापी आंदोलन करुन काँग्रेस विरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र याचा सामान्यांना मोठा त्रास होत आहे. याचाच प्रत्यय काल (दि.21) वरळी डोम येथे दिसून आला. एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यावर नाही तर मैदानात जाऊन आंदोलन करा असे ख़डेबोल सुनावले. रस्त्यावर वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा यामुळे महिलेने पोलीस आणि राजकारण्यांना (Political News) जाब विचारला.
22 Apr 2026 03:03 PM (IST)
maharashtra government decision News Marathi : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (22 एप्रिल 2026) पार पडली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिक्षकांचे वेतन, आयटी पार्क इत्यादींशी संबंधित निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर, सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, श्रेणी-स्तरीय धोरणाची तरतूद केली आहे.
22 Apr 2026 02:52 PM (IST)
मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन, पण या ट्रेनच्या स्थानकांवरून प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारी खरी 'लाईफलाईन' म्हणजे 'बेस्ट' बस! आता मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि गोड बातमी आहे. प्रवाशांची ही रोजची फरफट थांबवण्यासाठी आणि प्रवासाला पुन्हा वेग देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात लवकरच तब्बल 500 नव्या 'मिडी' बसेस दाखल होणार आहेत.
22 Apr 2026 02:41 PM (IST)
शेतकरी कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्यांकडे सादर करण्यात आलाय. अधिवेशन काळात २ लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर आता उर्वरित कर्जमाफीसाठी काय नवे निकष लावलेत का हे पाहावं लागेल.
22 Apr 2026 02:33 PM (IST)
बीड मधून मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनामी दरम्यान आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते तर दोन्ही बाजूचे वकील न्यायालयात हजर होते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण साक्षी पुराव्याच्या स्टेज वरती असून या प्रकरणात पुढील सुनावणी आता 7 में रोजी होणार आहे.
22 Apr 2026 02:21 PM (IST)
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून थरमॅक्स चौक ते ठाणे चौक दरम्यान जोरदार अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. थरमॅक्स चौक ते साने चौक या मार्गावर व्यापाऱ्यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे महापालिकेने बुलडोझरच्या साहाय्याने हटवली आहेत.
22 Apr 2026 02:12 PM (IST)
कल्याणमध्ये वीजमीटरमध्ये फॉल्ट असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत एका महिलेकडून तब्बल ३ लाख १० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील वीजमीटरमध्ये बिघाड असल्याचा बनाव करून संबंधित आरोपींनी कारवाईची धमकी दिली आणि महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात दोन खाजगी इलेक्ट्रिशियनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
22 Apr 2026 02:01 PM (IST)
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात बांगलादेशी नागरिकांची बोगस मतदार म्हणून नोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी Election Commission of India कडे तक्रार दाखल करून पुरावे सादर केल्याची माहिती दिली. Mumbai येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, दिल्ली आणि मुंबईतील निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून हे पुरावे देण्यात आले आहेत. धुळे, मालेगाव, मुंब्रा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, मालवणी, सिल्लोड, भिवंडी, रावेर आणि चिखली, अशा सुमारे 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
22 Apr 2026 02:00 PM (IST)
जॅकलीन फर्नांडिस आज एक ग्लोबल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जात असून, ती सातत्याने सकारात्मकता आणि उद्देशपूर्ण संदेशांचा प्रसार करताना दिसते. सीमांच्या पलीकडे आपली वेगळी ओळख निर्माण करणारी जॅकलीन आपल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विशेषतः महिला सशक्तीकरण आणि जागतिक एकतेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवण्यासाठी करत आहे.
22 Apr 2026 01:55 PM (IST)
राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रुपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) या ऑनलाइन प्रणालीमध्ये अकृषिक रुपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आली. या नव्या सुविधेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
22 Apr 2026 01:50 PM (IST)
संभाजीनगर शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेने निर्णायक टप्पा गाठला आहे. योजनेअंतर्गत शुद्ध पाणी पंपिंग यंत्रणा, विद्युत उपकरणे तसेच उद्धरण वाहिनीच्या काही भागांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, शहराला लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
22 Apr 2026 01:45 PM (IST)
अमेरिकेशी तणावादरम्यान इराणचा आता पाकिस्तानसोबत वाद पेटला आहे. पाकिस्तान आणि इराणच्या राजनैतिक संबंधात मोठी ठिणगी पडली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) यांच्यावर तीव्र टीका केली आहे. तसेच पाकिस्तान डबल गेम खेळत असल्याचा दावा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इराणच्या प्रसारमाध्यांमीन मुनीर यांना अमेरिकेचा पोस्टमॅन म्हणून संबोधले आहे. पाकिस्तान (Pakistan) निष्पक्षतेचा आव आणत असून अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचे इराणने म्हटले आहे.
22 Apr 2026 01:40 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्र. १७ द्वारे प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेसाठी जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, गुरुवार, दि. २१ मे २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
22 Apr 2026 01:35 PM (IST)
सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सलामीवीर अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये पाच विक्रम रचले आहेत. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) झालेल्या आयपीएल सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सलामीवीर अभिषेक शर्माने ४७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. १९८.५३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना, अभिषेक शर्माने ६८ चेंडूंमध्ये १० षटकार आणि १० चौकारांसह १३५ धावा केल्या. या शतकासह, अभिषेक शर्माने एकूण टी-२० क्रिकेटमध्ये पाच विक्रम प्रस्थापित केले आहेत.
22 Apr 2026 01:25 PM (IST)
पायलट फेजमध्ये ९,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वाटप केल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेने कॉर्पोरेट ग्राहकांसाठी त्वरित वर्किंग कॅपिटल डिमांड लोन सुविधेचा विस्तार केला आहे. अल्पकालीन कर्जाची जलद उपलब्धता कंपन्यांच्या दैनंदिन निधीच्या गरजा व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीवर कसा प्रभाव टाकत आहे, हे यामधून दिसून येते. ही सुविधा पात्र कॉर्पोरेट्सना डिजिटल प्रक्रियेद्वारे अवघ्या काही सेकंदात खेळते भांडवल उपलब्ध करून देते. यामुळे मॅन्युअल प्रक्रिया आणि बँकेच्या वेळेची मर्यादा दूर झाली आहे, ज्यामुळे कर्ज मर्यादा मंजूर असूनही निधी मिळण्यास होणारा पारंपारिक विलंब आता टळणार आहे.
22 Apr 2026 01:15 PM (IST)
सन मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तू अनोळखी तरी सोबती’मध्ये मासिक पाळी या अत्यंत संवेदनशील आणि समाजात अनेकदा न बोलल्या जाणाऱ्या विषयावर अतिशय सुंदर आणि जाणीवपूर्वक प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडील भागात या विषयाची सामाजिक जाणीव ठेवत प्रभावी मांडणी करण्यात आली असून, प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.या भागात मुख्य पात्र अर्पिता मासिक पाळीच्या काळातही घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना दाखवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तिचा नवरा समीर तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तो घरकामात हातभार लावतो, तिच्यासाठी जेवण तयार करून देतो आणि तिची मनापासून काळजी घेत तिचा भावनिक आधार बनतो.समाजात आजही अनेक ठिकाणी टाळला जाणारा हा विषय मालिकेत सन्मानपूर्वक आणि वास्तवदर्शी पद्धतीने हाताळल्यामुळे प्रेक्षकांमध्ये जागरूकता वाढत असून, या एपिसोडची विशेष चर्चा होत आहे.
22 Apr 2026 01:04 PM (IST)
कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅम परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला. आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.
22 Apr 2026 01:00 PM (IST)
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक असा देश आहे जो आपल्या सरकारच्या हुकुमशाहीसाठी ओळखला जातो. इथे नागरिकांना कठोर निर्बंधात ठेवलं जातं. इथे नागरिकांच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. जसे की, कपडे कसे घालावेत, हेअर स्टाईल कशी करावी. इथला नागरिक परवानगीशिवाय देश देखील सोडून जाऊ शकत नाही. माहितीनुसार, इथे एकेकाळी नागरिकांच्या हसण्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. आता अशा देशात वास्तव करणे म्हणजे कोणत्या आव्हानाहून कमी नाही. विचार करा जिथे तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात असेल, तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी जर कठोर कायदे असतील तर त्या देशात राहणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. पण अशा देशातून स्वत:ची सुटका करण्याचा विचार देखील आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
22 Apr 2026 12:56 PM (IST)
Supreme Court on Highway Parking Ban India News Marathi : रस्ते सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महामार्गांवर अवजड आणि व्यावसायिक वाहने उभी करण्यावर (पार्किंगवर) संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हा नियम ६० दिवसांच्या आत लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील महामार्ग अतिवेगवान वाहतुकीसाठी बांधले आहेत, परंतु निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापनामुळे ते अपघातांचे प्रमुख कारण बनले आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, बेकायदेशीर पार्किंग किंवा सदोष प्रणालीमुळे एक जरी जीव गेला, तरी ते एक गंभीर अपयश आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर कोणत्याही ट्रक किंवा व्यावसायिक वाहनांना उभे (पार्क) करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
22 Apr 2026 12:52 PM (IST)
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांनी दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिष वानखडे (वय २८ वर्ष), सत्यपाल भिसे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हृदयदारावक घटना घडली.
22 Apr 2026 12:47 PM (IST)
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पोर्टल महत्त्वाचे साधन ठरत आहे. पूर्वी ‘शी बॉक्स’ पोर्टल केवळ कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापुरते मर्यादित होते; मात्र, आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, रस्त्यावरची शेरेबाजी, तसेच इतर कोणतेही गैरवर्तन याबाबतही तक्रार नोंदविता येणार आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, कार्यालये व इतर संस्थांमध्ये या समित्या स्थापन करून त्यांची माहिती शी बॉक्स पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असलेल्या अनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांचा समावेश आहे.
22 Apr 2026 12:42 PM (IST)
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांचा आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y6t या नावाने सादर केला आहे. कंपनीने बजेट रेंजमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या हँडसेटमध्ये मजबूती आणि ड्यूरेबिलिटीवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जे यूजर्स कमी किंमत एक प्रिमियम स्मार्टफोन शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या डिव्हाईसची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
22 Apr 2026 12:37 PM (IST)
वर्किंग आय फिल्म्सच्या ‘बाप्या’ या आगामी मराठी चित्रपटातून एक भावस्पर्शी संगीत कलाकृती प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘एकाकी’ असे शीर्षक असलेले हे गाणे नात्यांमधील दुरावा, मनातील एकटेपणा आणि भावनांची खोलवर जाणीव यांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. हळुवार चालीत गुंफलेले हे गाणे ऐकताना प्रेक्षकांना स्वतःच्या अनुभवांचीही आठवण करून देते, त्यामुळे ते थेट मनाला भिडते.या गाण्याचे संगीत दिग्दर्शन अभिजीत चंद्रकला यांनी केले असून, शौनक नारळे (असर) यांनी त्याला अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्द दिले आहेत. सुरेल संगीत आणि संवेदनशील गीतलेखन यांचा सुंदर संगम ‘एकाकी’मध्ये पाहायला मिळतो.विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने या गाण्याद्वारे गायन क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनयातून आधीच प्रेक्षकांची मनं जिंकलेली मंजिरी आता आपल्या आवाजातूनही भावनांची प्रभावी अभिव्यक्ती करताना दिसते. तिच्या आवाजातील कोमलता गाण्याला एक वेगळीच उंची देते.
22 Apr 2026 12:32 PM (IST)
लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे सत्ताधारी भाजप आक्रमक झाले आहे. विरोधकांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून (BJP Politics) रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील वरळी डोम येथे भाजपच्या आंदोलनामुळे एका महिलेने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावर एक तास थांबावं लागल्यामुळे महिलेचा संताप झाला होता. यावरुन आता विरोधकांनी निशाणा साधला.
22 Apr 2026 12:27 PM (IST)
“राज्यात भोंदूगिरीला राजकीय पाठबळ मिळत असून त्यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. “महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून ते कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे,” अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार Rohit Pawar यांनी सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
22 Apr 2026 12:17 PM (IST)
नाशिक : डोंगर फोड, नदीचा बिमोड आणि बेसुमार वृक्षतोड यांसारख्या विनाशकारी विकास धोरणांविरोधात ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’ च्या वतीने मंगळवारी (२१ एप्रिल 2026) बी. वाय. के. कॉलेज सिग्नल ते राजीव गांधी भवन या मागांवर लढाऊ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नाशिककर व तरुणाई आणि जेन-झेड ऑक्सिजन मास्क घालून सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात केळी घेऊन प्रतीकात्मक निषेध नोंदवला. ‘हरित कुंभ’ च्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षमुक्तीच्या धोरणाचा निषेध करत नागरिकांनी घोषणाबाजी केली आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
22 Apr 2026 12:12 PM (IST)
मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मनसेच्या वतीने आता, 'मला मराठी येते' अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर आजपासून लावले जाणार आहेत.
22 Apr 2026 12:07 PM (IST)
राज्यावर यंदा एल निनोच्या संकटांचे ढग असल्यामुळे सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच महापालिकांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'एल निनो'चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
22 Apr 2026 12:00 PM (IST)
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणमध्ये लष्करी कारवाई सुरु केली होती. या लष्करी कारवाईने संपूर्ण जग हादरले होते. या हल्ल्यात इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई (Ali Ayatollah Khamenei) यांचा मृत्यू झाला.
22 Apr 2026 11:54 AM (IST)
स्कॉट बेझंट यांनी इराणवर आर्थिक दबाव वाढवण्याचे आणि बंदरांवरील नाकेबंदी सुरू ठेवण्याचे आवाहन केले, तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुझ प्रदेशात शस्त्रसंधी वाढवण्याची आणि निर्बंध सुरू ठेवण्याची घोषणा केली.
22 Apr 2026 11:53 AM (IST)
ग्रामीण भागात रक्ताच्या नात्यांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून होणारे वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी अवघ्या १०० रुपयांत होणार आहेत. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील नावे वेगळी करण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि कायदेशीर कटकटीतून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता झाली आहे.
22 Apr 2026 11:43 AM (IST)
कर्नाटकातील बंगलोरमध्ये ‘प्रपोज’च्या बहाण्याने तरुणीने प्रियकर किरणला घरी बोलावून हात-पाय बांधले, डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याच्यावर रॉकेल ओतून जाळले. संशय आणि रागातून हा खून केल्याचा आरोप.
22 Apr 2026 11:20 AM (IST)
पुणे : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने अचानक नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. या धडकेत दुकानाचे नुकसान झाले असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
22 Apr 2026 11:10 AM (IST)
प्रमोद महाजन यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटनेने राजकारणात मोठी खळबळ उडाली. घरगुती वादातून त्यांच्यावर झालेला हा गोळीबार सर्वांना धक्का देणारा होता. २२ एप्रिल २००६ रोजी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या सख्ख्या भावाने,प्रवीण महाजन यांनी गोळी झाडली. या धक्कादायक घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रमोद महाजन हे भाजपचे प्रभावी आणि धोरणात्मक नेते म्हणून ओळखले जात होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि निवडणूक रणनीतीत त्यांचे मोठे योगदान होते.
22 Apr 2026 10:55 AM (IST)
आयपीएल २०२६ च्या ३१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. हैदराबादचा या हंगामातील हा चौथा विजय होता, तर दिल्लीला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या विजयाचा नायक सलामीवीर अभिषेक शर्मा होता, ज्याने अवघ्या ६८ चेंडूंमध्ये सामना जिंकून देणारी १३५ धावांची खेळी केली. तथापि, २४३ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. इशान मलिंगाने चार बळी घेतले. इतकेच नाही तर, हैदराबादचा लेग-स्पिनर हर्ष दुबेनेही लक्ष वेधून घेतले. वास्तविक, या २३ वर्षीय क्रिकेटपटूने डावाचे शेवटचे षटक टाकून तीन बळी घेत एक विक्रम प्रस्थापित केला. चला, या तरुण फिरकी गोलंदाजाबद्दल आणि त्याच्या विक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊया.






