सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या दबंग अभिनेत्याला सुरक्षा पुरवली आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Gangster Lawrence Bishnoi)टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.(Threat to kill Salman Khan)या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या दबंग अभिनेत्याला सुरक्षा पुरवली आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी पुन्हा एकदा सलमान खानला दिलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. तसेच यावेळी पोलिसांनी अभिनेता सलमान खानला अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला आधीच वाय-प्लस सुरक्षा दिली आहे.

    अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक पोस्टमध्ये गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील त्याच्या घराबाहेर गोळीबार करून मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता तुमच्या ‘भावाला’ वाचवण्याची वेळ आली आहे.सलमान खानसाठीही हा संदेश आहे – दाऊद तुला वाचवेल अशा गैरसमजात राहू नकोस तुला कोणीही वाचवणार नाही. सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दल तुझी नाट्यमय प्रतिक्रिया फारशी कोणाच्या लक्षात आली नाही, परंतु तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध काय होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे… आता तू आमच्या रडारवर आहे. हा फक्त ट्रेलर होता, पूर्ण चित्रपट बाकी आहे. तो लवकरच येई.. तू कोणत्या देशात पळून गेला हे महत्त्वाचे नाही, लक्षात ठेव, मृत्यूला व्हिसाची आवश्यकता नाही. ती कदाचित विनाआमंत्रित देखील येऊ शकते.

    लॉरेन्स बिश्नोईच्या मेसेजनंतर गिप्पी ग्रेवालने स्पष्ट केले की, त्याचे सलमान खानशी जवळचे संबंध नाहीत. ‘मौजा ही मौजा’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी त्याची सलमानशी भेट झाली. मात्र, त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने त्यांना तिथे बोलावले होते. तो म्हणाला की, माझी सलमानशी मैत्री नाही. त्याचा राग माझ्यावर काढला जात आहे. हे माझ्यासाठी अजूनही धक्कादायक आहे.

    दरम्यान, मार्च महिन्यात सलमानला बिश्नोई टोळीतील एका सदस्याकडून धमकीचा मेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे.