फोटो सौजन्य - Social Media
याचबरोबर त्याने पॉर्नोग्राफीचे मानसिक आणि सामाजिक परिणामही मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या सामग्रीमुळे वास्तव जीवनाबाबत अवास्तव अपेक्षा निर्माण होतात, वेळ वाया जातो आणि व्यक्ती आपल्या उद्दिष्टांपासून दूर जाऊ शकते. विशेषतः पुरुषांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असेही त्याने सांगितले.
अभिनवचे हे विधान ऐकून रुबीना दिलैक आश्चर्यचकित झाली आणि नंतर हसू लागली. हिना खान आणि रॉकी जयसवाल यांनीही हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. मात्र या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना अभिनवने मांडलेला मुद्दा विचार करण्यासारखा वाटला, तर अनेकांनी त्याच्या दाव्यावर टीका केली.
Kuch zyada hi dark hogaya 🌚 #HinaKhan #RubinaDilaik #AbhinavShukla pic.twitter.com/Gsi8LGri25 — Hina_khanfc (@Hinakhanfc24) July 18, 2026
दरम्यान, ‘The4POV’ पॉडकास्ट यापूर्वीही वादात सापडला होता. एका भागात रुबीनाने अभिनेता गौरव खन्ना यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या कथित टिप्पणीचा उल्लेख केला होता. त्या प्रकरणानंतर झालेल्या चर्चेनंतर आता अभिनवच्या नव्या वक्तव्यामुळे हा पॉडकास्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






