पणजी : भाजपानंच गोव्याचा विकास केला असल्याचा दावा केला. गांधी कुटुंबीयांसाठी गोवा तर फक्त सुटी एन्जॉय करण्याचं ठिकाण होतं, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली.
अमित शाह यांचं दाबोलिम विमानतळावर भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे उपस्थित होते. अमित शाह यांनी आज पोंडा येथील सभेला संबोधित करण्याआधी दक्षिण गोव्यातील बोरिम गावातील साईबाबा मंदिराचं दर्शन घेतलं. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अमित शाह सांवोदेंम विधानसभा मतदार संघात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत.