विराट कोहली बाद होताच केएल राहुलची 'ती' रिअॅक्शन Viral, पाहा Video
चॅम्पियन्स ट्रॉफीतला उपांत्य फेरीतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सुरु आहे. भारताची फलंदाजी सुरु आहे. भारतासमोर २६५ धावांचे लक्ष आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल बाद होऊन मैदानाबाहेर पडले. अशात विराट कोहली चुकीचा शॉट मारत बाद झाला. विराट ८४ धावांवर खेळत होता.
Kl Rahul saying: Me maar rha tha na 😭😭( After kohli threw his wicket) pic.twitter.com/Vb6oOdoOgy
— It’s_Harshit 卐💛 (@Mahirat_k_choda) March 4, 2025
पहिले चार फलंदाज बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भागीदारीची जबाबदारी घेतली. एका बाजूने विराट कोहली सावधगिरीने खेळत होता. तर दुसऱ्या बाजूने केएल राहुल हा तुफान फटकेबाजी करत होता. त्यात विराटने ८४ धावांवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये विराट बाद झाला. फक्त १६ धावांनी त्याचे शतक हुकले.
Kl Rahul saying: Me maar rha tha na 😭😭( After kohli threw his wicket) pic.twitter.com/Vb6oOdoOgy
— It’s_Harshit 卐💛 (@Mahirat_k_choda) March 4, 2025
विराटने चुकीचा ॲडम झाम्पाने टाकलेल्या बॉलवर जोरदार शॉट मारला आणि त्याची कॅच बेन द्वारशुईसने घेतली. विराट चुकीच्या शॉटवर बाद झाल्याने केएल राहुलला फार वाईट वाटले. राहुल विराटकडे पाहून ‘अरे मी मारत होतो ना..’ असे म्हणाला. त्याची ही रिएक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. राहुलप्रमाणे प्रत्येक भारतीय चाहत्याला वाटले होते की विराटने शतक पूर्ण करावे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतला उपांत्य फेरीतला पहिला सामना सुरु आहे. सामन्यामध्ये टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५० षटकांमध्ये २६४ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स तर वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.