फोटो सौजन्य - Social Media
गोव्याच्या पर्यटन दृष्टीकोणात बदल घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री रोहन ए. खंवटे यांनी ‘लेट्स गोवा’चा शुभारंभ केला आहे. हे एक अभिनव असे डिजिटल माध्यम आहे, जे स्थानिक आणि पर्यटकांना अखंड प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. मंत्रालय, पर्वरी येथे झालेल्या या शुभारंभ समारंभात मुख्य सचिव, डॉ. व्ही. कंडवेलू, आयएएस, पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका, आयएएस, आयटीचे सहसंचालक मिलिंद साखरदांडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लेट्स गोवा, हे पर्यटन अनुभवाचे माध्यम (टीईपी) पर्यटक, स्थानिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी एक परिवर्तनकारी मंच आहे, ज्यात हॉटेल व्यवसायिक, वाहतूक एजन्सी, सेवा प्रदाते आणि क्रियाकलाप ऑपरेटर यांचा समावेश आहे. हे व्यवसायांना त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यास अनुमती देते तसेच पर्यटकांना ते सहजपणे शोधण्यास आणि बुक करण्यास सक्षम करते.
या शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की “गोवा हे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि लेट्स गोवाचे लॉंच हे अखंड, तंत्रज्ञान-आधारित सेवा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे व्यासपीठ गोव्याचा समृद्ध वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रदर्शन करण्यास मदत करेल तसेच पर्यटक आणि स्थानिकांसाठी समान सुविधा सुनिश्चित करेल.
पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे म्हणाले, की “लेट्स गोवा हे पर्यटन अनुभव व्यासपीठ गोव्यातील सेवा, पर्यटन, तंत्रज्ञान आणि स्थानिक व्यवसायांना एकत्रित करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करते. लेट्स गोवासह पर्यटकांच्या गोव्यातील प्रवासावेळी सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वसनीय, एकल-पॉइंट संसाधनासह सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे स्थानिक व्यवसायांना व्यापक प्रेक्षकांशी जोडल्यामुळे त्यांचा फायदा होईल.”
लेट्स गोवा हे पर्यटकांसाठी एकाच ठिकाणी तोडगा प्रदान करते ज्यात निवास, साहसी क्रियाकलाप, सांस्कृतिक अनुभव आणि अधिकसाठी बुकिंग प्रदान करते. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये पॅराग्लायडिंग, जंगल सफारी आणि कयाकिंग यांसारख्या क्रियाकलापांसाठी सुरक्षित ऑनलाइन बुकिंग समाविष्ट आहे, तसेच डिजिटल पर्यटन कार्ड (ई-कार्ड) जे पर्यटकांना अनन्य सवलती, बक्षिसे आणि रिडीम करण्यायोग्य वाहतूक पॉइंट्स अनलॉक करते. हे माध्यम इव्हेंट, अन्य आकर्षणे आणि महोत्सवांबद्दल अध्ययावत माहिती देखील प्रदान करते.
सुनील अंचिपाका, आयएएस, पर्यटन खात्याचे संचालक यांनी सांगितले, की लेट्स गोवा हे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी, स्थानिक सेवा पुरवठादार, पर्यटक आणि अधिकारी यांना जोडणारे एक मोठे परिवर्तनीय व्यासपीठ आहे. “यात १०० हून अधिक हॉटेल्स, ५० हून अधिक क्रियाकलाप प्रदाते आणि जीटीडीसी निवासस्थानांसह, माध्यम बुकिंग सुलभ करते आणि गोव्याचा समृद्ध वारसा, वेलनेस, साहस आणि अंतर्गत पर्यटनाला देखील प्रोत्साहन देते.”
या समारंभात अखंड डिजिटल जोडणीसाठी ७५ मोफत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स, मोबाइल नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी ११ ४जी बीएसएनएल टॉवर आणि कार्यक्षम नियोजन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वन मॅप गोवा जीआयएस पोर्टलचा देखील शुभारंभ झाला. लेट्स गोवा गोव्याचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी एक साधन म्हणूनही काम करते. गोव्याचे अस्सल आकर्षण जपून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊन, पर्यटक ऐतिहासिक खुणा शोधू शकतात, महोत्सवांना उपस्थित राहू शकतात आणि गोव्यातील खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस डिझाईन, सुलभ पेमेंट आणि अविस्मरणीय अनुभव प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून, लेट्स गोवा हे प्रत्येक प्रवाशासाठी गोव्याच्या पर्यटन आत्म्याचे प्रवेशद्वार बनण्यास सज्ज आहे.