फोटो सौजन्य: Social Media
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण देश आज हळहळ व्यक्त करीत आहे. वयाच्या ९२ व्या त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबरला अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकीर्दीत भारताला एक नवीन दिशा दाखवली होती. त्यांची उचललेले महत्वाच्या पाउलांनी देशाला अनेक फायदे झाले आहेत. वेगवेगळ्या निर्णयांमधून त्यांची देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न देखील केले आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्व अगदी साधे होते. ज्यामुळे ते सामान्य लोकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होते. मनमोहन सिंग यांना अनेक गोष्टी आवडत होत्या, त्यातीलच एक म्हणजे कारमधून फिरण्याची आवड. म्हणूनच त्यांच्या ताफ्यात अनेक कार्स होत्या.
१९९६ मध्ये मनमोहन सिंग यांनी मारुती 800 खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत किती असेल, त्याचे फीचर्स काय आहे? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
आज जिथे प्रत्येक कार लाखो रुपयात मिळत आहे, अशावेळी १९९६ मधील अनेक कार्स या हजारांच्या किंमतीत मिळत होत्या. आज आपण अशा एका कारची किंमत जाणून घेणार आहोत.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कार्समधून फिरण्याचा चांगलाच शौक होता. १९९६ मध्ये त्यांनी मारुती 800 खरेदी केली होती, ज्याची किंमत तेव्हा फक्त 21 हजार होती. विशेष म्हणजे या कारसाठी त्यांची पत्नी गुरशरण कौर 20 हजार रुपये दिले होते. मनमोहन सिंग याच्या ताफ्यात अनेक कार्स होत्या. यात काही लक्झरी कार्स सुद्धा होत्याच. पण, त्यांचे पहिले प्राधान्य हे नेहमीच मारुती 800 ला होते. मारुतीची ही कार मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेली एकमेव कार होती. म्हणूनच त्याच्यासाठी ही कार स्पेशल होती. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
मनमोहन सिंग यांच्या प्रिय कारमध्ये म्हणजेच मारुती 800 मध्ये एअर कंडिशनर, व्हिल Covers, रिअर सीट हेडरेस्ट, टॅकोमीटर, फॅब्रिक Upholstery, Adjustable हेडलॅम्प, Tinted glass, अँटी-थेफ्ट अलार्म, रिअर सीट्स बेल्ट्स, साईड इम्पॅक्ट बीम्स, Adjustable सीट्स आणि इतर फीचर्सचा देखील समावेश आहे.
Manmohan Singh PHD: मनमोहन सिंगांची पीएचडी..; भारताच्या अर्थव्यस्थेचा महत्त्वाचा दस्ताऐवज
मोदी सरकारमधील राज्यमंत्री असीम अरुण यांनी एक्सवर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अरुण यांनी मनमोहन सिंग आणि मारुती 800 बाबतची एक आठवण शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये असीम अरुण म्हणतात,” डॉ. साहेबांकडे फक्त एकच कार होती. ती कार म्हणजे मारुती 800, जी पीएम हाऊसमध्ये चमकणाऱ्या काळ्या BMW च्या मागे उभी होती. मनमोहन सिंगजी मला वारंवार सांगत होते, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही, माझी गाडी ही (मारुती) आहे. मी समजावून सांगायचो की सर ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही. दुसऱ्या कारचे सेफ्टी फीचर्स चांगले आहेत म्हणूनच SPG ने ही कार घेतली आहे. पण जेव्हा केव्हा मारुतीच्या समोरून गाडीचा ताफा गेला की ते त्याकडे अगदी मनापासून पाहत असे.”