" येवा गोवा आपलाच आसा"; हरमल समुद्रकिनारी सीफूड महोत्सवाला उदंड प्रतिसाद
पर्यटन विभाग, गोवा सरकारच्या वतीने आयोजित “रापोणकारांचो सीफूड” या महोत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मासे प्रेमींसाठी ही मोठी पर्वणीच असणार आहे. गोव्यात पर्य़टकांना जसा समुद्र आणि निसर्गाच्या सान्निध्य़ातली ठिकाणं जशी खुणावतात तसंच गोव्यातील खाद्यसंस्कृती देखील फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वनवर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांची गोव्याला पसंती असते.
याचपार्श्वभूमीवर हरमलच्या समुद्रकिनारी सीफूड महोत्सव सुरु करण्यात येत आहे. १३ डिसेंबर रोजी निसर्गरम्य हरमल समुद्रकिनारी या महोत्सवाला सुरुवात झाली होती. या महोत्सावाला पर्यटक आणि खवय्ये प्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष आणि सावर्डे मतदारसंघाचे आमदार डॉ. गणेश गावकर आणि मांद्रेचे आमदार श्री जीत आरोलकर आणि पर्यटन संचालक श्री सुनील अंचिपाका, आयएएस, यांची उपस्थिती लाभली. पिढ्यानपिढ्या रापणाने मासेमारी करणाऱ्य़ा व्यावसायिकांना रापणकर म्हटलं जातं. या रापणकर मंडळींच्या व्य़ावसायाला प्रोत्साहन आणि चालना मिळावी असा देखील हेतू या महोत्सावामागे होता. त्याचबरोबर परदेशी पाहुण्यांचं खास गोव्याच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं होतं. या महोत्सवात उपस्थित असलेल्या परदेशी पाहुणे तसंच खवय्यांनी गोव्य़ाच्या खाद्य़संस्कृतीचा मनमुराद आनंद लुटला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाइन ऑन बँड, कॉस्मिक साउंड लाइव्ह सेट, उस्मान आणि ओजी शेझ यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाचा समावेश होता. यात स्थानिक आणि पर्यटक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
‘या’ किल्ल्यावर जाणवतं कुणाचं तरी अस्तित्व; सायंकाळ झाली तर येथे फिरकण्यास शासनानेच केली बंदी
“रापणकारांचो सीफूड महोत्सव’ हा केवळ आपल्या समृद्ध पाक परंपरेचा उत्सव नाही तर शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.असं पर्यटन मंंत्री रोहन खवंटे यांनी सांगितले. गोव्याच्या किनारपट्टीचा वारसा घडवण्यात आमच्या मासेमारी समुदायाची महत्त्वाची भूमिका हा महोत्सव ओळखतो. अशा कार्यक्रमांद्वारे, केवळ पर्यटकांना आकर्षित करणेच नव्हे तर आपल्या स्थानिक परंपरा व समुदायांना साजरे करणे तसेच त्यांचे समर्थन करणे, हे राज्याचे उद्दिष्ट आहे. यासारख्या महोत्सवांमुळे गोव्यातील लोकांना लाभदायक आणि सर्वसमावेशक पर्यटन परिसंस्था तयार करण्यास मदत होते.” अशा भावना खवंटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
खाद्यसंकृती बरोबरच कलाप्रेमींसाठी संगित कलेची मेजवानी देखील या महोत्सावात पाहायला मिळाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पर्पल रेन, ग्रॅव्हिटी बँड, डीजे कॅट्रिन आणि डीजे इव्हान यांचे सादरीकरण पहायला मिळाले . तर तिसऱ्या दिवशी द इम्पीरियल बँड, फोरफ्रंट तसेच डीजे अफरोज सय्यद आणि तेरी मिको यांचे सादरीकरण पर्यटकांसाठी दुप्पट पर्वणी होती. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटनाला अजून चालना मिळावी आणि स्थानिकांना यातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गोवा राज्य सरकार कायमच तत्पर असतं. हे अशा महोत्सवातून प्रकर्षाने दिसून येते.