फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हला भीती काय असते? हे जाणून घ्यायचे आहे तर भानगडची रात्र पहा. परंतु, येथे सायंकाळ झाली तर कुणाला फिरकण्याची परवानगी नाही. भारतीय शासनाने सायंकाळनंतर येथे फिरकण्यास बंदी केली आहे. १७ व्या शतकात राजा माधोसिंग यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. अतिशय भव्य दिव्य तसेच निर्सगाने वेढलेला असा हा किल्ला जगभरात आपल्या गोष्टीमुळे कुप्रसिद्ध आहे. भानगड किल्ल्याला ‘आशियातील सर्वात भुताटकीचा किल्ला’ मानले जाते, आणि येथे सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास भारत सरकारने बंदी घातली आहे.
भानगड किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे. राजस्थानमधील ही एक फार प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्याचा इतिहास राजा माधोसिंग आणि त्यांचे वडील राजा मान सिंग यांच्याशी जोडलेला आहे. मुळात, एका तांत्रिकाला राणी रत्नावतीवर प्रेम जडले. आपल्या जादूने त्याने राणीला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला. राणीला ही बाब लक्षात येताच तिने त्या जादूचा प्रतिकार केला आणि तंत्रिकांचा मृत्यू झाला. मारताना त्याने भानगडाचा नाश होईल असा शाप दिला.
अनेक व्यक्तींचे या किल्ल्याविषयी अनेक अनुभव आहेत. अनेक कथा आहेत. कुणाला रात्री किल्ल्यातून चित्र विचित्र आवाज येतात. चित्र विचित्र आकृत्या दिसतात. तसेच कुणाची तरी उपस्थिती जाणवते. या सर्व बाबींमुळे
भानगडचा किल्ला संध्याकाळी फिरकण्यास बंद केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता, या किल्ल्याचा वातावरणीय आणि भूगर्भीय अभ्यास करण्यात आला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात रेडिओऍक्टिव्ह लहरी असल्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामुळे लोकांना अस्वस्थता आणि भ्रम होतो.
जर तुम्हाला रहस्य या शब्दाची आवड आहे. तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. निसर्ग म्हणून पहिले तर भानगडच नजारा काही औरच आहे आणि रहस्य म्हणून पाहिले तर भानगड किल्ल्यावर नजरेस येणाऱ्या शक्ती काही औरच आहेत. किल्ल्याच्या आत विविध मंदिरे, दरवाजे आणि भव्य बांधकामे आहेत. भानगड किल्ल्याच्या आवारात सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या क्षेत्राला धोका म्हणून घोषित केले आहे. भानगड किल्ल्याचा इतिहास, दंतकथा, आणि त्याच्या अनाकलनीय घटनांमुळे तो रहस्यमय ठिकाणांमध्ये अग्रस्थानी आहे. किल्ल्याची यात्रा करताना या स्थानाचा आदर राखणे आणि स्थानिक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.