फोटो सौजन्य - Social Media
मुंबई/नीता परबः मुंबईतील परळ स्थित बाई जेरबाई वाडिया रुग्णालय हे देशातील अग्रगण्य बालराेग व मातृआराेग्य केंद्रांपैकी महत्वपूर्ण केंद्र म्हणून नाेंद आहे. लहान मुलांच्या आजार व उपचारांसाठी हे रुग्णालय वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. देशाच्या कानाकाेपऱ्यातून या रुग्णालयात लहान मुले उपचाराकरीता दाखल हाेत असतात. मागील काही वर्षात रुग्णालयाने नव-नवीन यंत्रणा रुग्णसेवेत दाखल केली आहे. ज्यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हाेत आहे यामुळे रुग्णांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत आहेत. दर्जेदार रुग्णसेवा व रुग्णालयाला आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्यासाठी बाई जेरबाई वाडिया रुग्णालय समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांचा माेलाचा वाटा आहे. डॉ. मिनी बोधनवाला यांना महिला व बाल आरोग्य क्षेत्रात आपला आगळा-वेगळा ठसा उमटवत त्यांच्या नेतृत्वाखाली वाडिया रुग्णालये देशातील अग्रगण्य बालरोग व मातृआरोग्य केंद्रांमध्ये नाेंद झाली आहे.
डाॅ. बोधनवालांच्या प्रयत्नांमुळे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ४० हून अधिक उप-विशेषज्ञ सेवा अत्यल्प दरात किंवा मोफत उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठ्या नवजात अतिदक्षता विभागांपैकी एक येथे कार्यरत असून बालमृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. त्यांच्या पुढाकारातून उभारलेले ‘लिटल हार्ट्स मॅरेथॉन’ उपक्रमातून हजारो मुलांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी निधी उभारण्यात आला. ज्यामुळे अनेक लहान मुलांना जीवनदान मिळाले आहे. तसेच सुरक्षित प्रसूती व परवडणाऱ्या आयव्हीएफ सेवा देखील येथे सुरु करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे मध्यमवर्गीय जाेडप्यांना दिलासा मिळत आहे.
३ लाखांहून अधिक रुग्णांना माेफत सेवा
डॉ. बोधनवाल यांनी बाई जेरबाई वाडिया आणि नायर वाडिया मातृत्व रुग्णालयांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनवत दरवर्षी ३ लाखांहून अधिक रुग्णांना मोफत सेवा दिली आहे. नवजात आयसीयू, बालकर्करोग, हृदयशस्त्रक्रिया व आयव्हीएफ सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून मातामृत्यू व बालमृत्यूदरात घट आणण्यात त्यांचे माेलाचे याेगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो मुलांचे प्राण वाचवले आहेत.
ग्रामीण भागात हॉस्पिटल ऑन व्हील्स उपक्रम माेफत आराेग्यसेवा
ग्रामीण भागात ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ उपक्रमाच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा पाेहचली आहे. त्यांनी महिलांमध्ये आरोग्य व सकस अाहार याबाबत जनजागृती करत महिलांच्या आराेग्यावर प्रभाव टाकला आहे. तरुण वयात मुलींनी, तसेच महिलांनी आराेग्याची काळजी कशी घ्यावी, यावर त्यांनी विशेष अभियान राबविले आहे. कोविड-१९ च्या संकट काळात डॉ. बोधनवालांच्या नेतृत्वात ३.५ कोटींहून अधिक स्थलांतरितांना जेवण पुरवण्यात आले. सुरक्षित प्रसूती व बालसेवा सुनिश्चित करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे जीवंत उदाहरण आहे.
१५५ बेडचे आयसीयू
डॉ. बोधनवाला या केवळ एक कुशल डॉक्टर आहेत त्याचबराेबर सामाजिक दाियत्व व समाजात अाराेग्याच्या दृष्टिने बदल घडावेत यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असताे. याशिवाय त्यांनी १५५-बेडचे नवजात आयसीयूची स्थापन केली आहे, जे देशभरातील सर्वात माेठे आयसीयु पैकी एक मानले जाते. क्लब फूट, कर्करोग, कुपोषण, एचआयव्ही, एपिलेप्सी, अपंगत्व, दृष्टिहानी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार देणाऱ्या क्लिनिक्सची स्थापना त्यांनी केली आहे.
लिटल हाट्र्स मॅरेथाॅन स्पर्धा उल्लेखनीय कार्य
त्यांनी सुरु केलेली ‘लिटल हार्ट्स मॅरेथॉन’, १००-बेड कोविड वॉर्ड, तसेच ८ आठवड्यांत ३.५ कोटी जेवण वाटपाची मोहिम समाजसेवेसाठी त्यांच्या कटिबद्धतेचे प्रमाण असून इम्प्रक्ट इंडिया फाउंडेशन च्या माध्यमातून हाॅिस्पटल ऑन व्हिल्स उपक्रमही त्यांनी सुरु केला आहे, ज्याचा थेट लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना हाेत आहे. डॉ. मिनी बोधनवालांच्या कार्यामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात दीर्घकालीन प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील चॅरिटेबल हॉस्पिटल्स व सामुदायिक कार्यक्रमांनी असंख्य गरीब व उपेक्षित नागरिकांचे आराेग्य सुधारले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य व महिलांच्या हक्कांसंदर्भात विचारवंत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.