फोटो सौजन्य सोशल मिडिया
फॅटी लिव्हरचे निदान आपल्याला लवकर कळत नाही; आपल्या लिवरमध्ये थोडीशी चरबी साठलेली असते. सुरुवातीला याचा त्रास जाणवत नाही पण या कडे दुर्लक्ष करू नये? फॅटी लिव्हर असल्यास काय खावे आणि काय खावू नये.
Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खाल्याने लगेचं झोप का येते ? काय आहे कारण, जाणून घ्या…
फॅटी लिव्हर असलेल्यांनी काय खावे आणि काय टाळावे हे समजून घेणे म्हत्वाचे आहे. फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी प्रामुख्यांने पोळी खाणे गरजेचे आहे. कारण पोळी ही गहू ज्वारी ,नाचणी या पासून बनलेली असते. या मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; फायबर युक्त पदार्थ फॅटी लिव्हरसाठी फायदेशिर असते. तेव्हा पोळी (चपाती ) फॅटी लिव्हरसाठी चांगली असते.
शक्यतो भाता खाणे टाळावे – फॅटी लिव्हर असलेल्यांनी जास्त प्रमाणात भात खाणे टाळावे, भाता मध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्याच बरोबर साखरे सारखे पदार्थ आणि मैदा पूर्णपणे कमी करावे याने फॅटी लिव्हर वाढण्याची शक्यता असते.
फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे – दुर्लक्ष करू नका
सतत थकवा लागणे कारण नसताना दम लागणे , लिव्हरवरती जास्त ताण आल्यावर ताकद कमी होणे आणि सूज वाढणे ही सुरुवातीच्या फॅटी लिव्हर किंवा मेटाबॉलिक बिघाडाची शक्यता असते.
बरगडीखाली उजव्या बाजूला हलका दुखणे किंवा विचित्र जडपणा जाणवणे, जेवल्यानंतर पोट खूप भरल्यासारखे वाटणे, गॅस होणे. ही लिव्हरमध्ये चरबी साठल्याचे संकेत असू शकतात. लिव्हरमध्ये चरबी वाढल्यास पोटात जडपणा,अपचन, शौचालयाची वेळ बदलणे असे अनेक त्रास जाणवू शकतात.
शारीरिक हालचाल कमी असलेले, जास्त वजन असलेले, इन्सुलिन रेसिस्टन्स, टाइप 2 डायबेटीस, PCOS किंवा जास्त Triglycerides असलेले लोक यांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो. जास्त साखर, प्रोसेस्ड फूड, सततचा ताण आणि बसून राहण्याची सवय यामुळे लिव्हरमध्ये चरबी हळूहळू साठत जाते आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. थोडेसे मद्यपानसुद्धा लिव्हरमध्ये चरबी वाढवते आणि प्रौढांमध्ये वाढवू शकते. पेस्ट्री, तळलेले पदार्थ, सोडा, पॅकेट ज्यूस हे सर्व लिव्हरमध्ये सूज वाढवणारे मुख्य कारण आहेत.
उशीरा जेवण केल्यास मेटाबॉलिझम बिघडतो, लिव्हरमध्ये चरबी साठते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
सतत ताण आणि दिवसभर बसून राहणे – यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, मेटाबॉलिझम बिघडतो आणि फॅटी लिव्हर अधिक गंभीर होतो.
Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ






