फोटो सौजन्य - Social Media
आजकाल नवजात बाळांसाठीही बाजारात अनेक पदार्थ मिळतात. यामध्ये त्यांचे कपडे, डायपर, औषधे तर गरजेच्या गोष्टी आहेत. परंतु, बाळाला नटवण्यासाठी त्यांना लाली-पावडर लावणे अतिशय चुकीचे आहे, असे अनेक त्वचारोगतज्ञ् नेहमी सांगतात. नवीन जन्मजात बाळासाठी काय करावे? त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात? या बाबी अतिशय कठीण असतात. प्रत्येकाला लहान बाळ सांभाळता येईल असे नसते. यामध्ये काही जुन्या महिला बाळांसाठी काही ना काही उपाययोजना करत असतात. त्यामध्ये बाळांना पावडर लावण्याचे काही संदेश देतात. जे अतिशय चुकीचे असतात. अनेकदा लहान बाळाला गर्मी पासून वाचवण्यासाठी टॅल्कम पावडर लावण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही या सल्ल्याला मानत असाल तसेच ते ऐकून आपल्या बाळाला असे पदार्थ लावत असाल. तर तुम्ही तुमच्या बाळाला गंभीर परिणामांकडे ढकलत आहात.
हे देखील वाचा : ‘या’ सर्वसामान्य चुकांमुळे प्रेशर कुकर होतो ब्लास्ट! वेळीच रहा जाणकार
लहान नवजात बाळांना पावडर लावण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्वचारोगतज्ञ डॉ. अंकुर सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट केली आहे.पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी लहान बाळांना पावडर लावण्याच्या गंभीर परिणामांवर चर्चा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि नवजात बाळांना टॅल्कम पावडर लावल्याने आरोग्यासंबंधित अनेक नुकसान होतात. डॉ.अंकुर म्हणतात कि जेव्हा आपण लहान बाळांना पावडर लावतो. तेव्हा पावडरचे सूक्ष्म कण बाळांच्या नाका तोंडात जाण्याची खूपं शक्यता असते. श्वसनावाटे जर ते कण शरीरात गेले तर बाळाला श्वासासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर बाळांच्या फुप्फुसाला त्रास होऊ शकतो.
हे देखील वाचा : नखं आरोग्याविषयी बरच काही सांगतात; जाणून घ्या तुमचे आरोग्य काय म्हणते?
नवजात बाळांना टॅल्कम पावडरपासून दूर ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे कर्करोगाच्या शक्यतेत वाढ होते. विशेषकरून जेंटल एरियांवर पावडर थापणे थांबवावे. याने त्वचेची जळण तर होतेच त्याचबरोबर कर्करोग होण्याचीही शक्यता असते. लहान मुलांसंबंधित कोणतेही आरोग्य विषयक निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. संवेदनशील भागामध्ये पावडर लावल्याने त्वचेच्या जळणाचे प्रमाण वाढते. जर तुमच्या बाळांना घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर पावडर लावण्यापेक्षा सरळ डॉक्टरकडे जा. त्यांच्या सल्ल्यानुसार गोष्टी करा.