फोटो सौजन्य - Social Media
खासकरून मुली त्यांच्या नखांवर विशेष लक्ष देतात.मुलींना त्यांची नखे सजवून ठेवण्याची निराळी आवड असते. बहुतेक मुलांना आपली नखे वेळोवेळी कापण्याची सवय असते. परंतु, नखांप्रती अशी विशिष्ट आवड मुलांमध्ये इतकी दिसण्यात येत नाही. डॉक्टर नेहमी सांगत असतात कि आपण आपल्या नखांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वेळोवेळी कापली पाहिजे. एकंदरीत, त्यांची निगा राखिली पाहिजे. कारण, ही नखे आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगत असतात. या नखांच्या आरोग्यामार्फत आपण आपल्या शरीरामध्ये कशाची कमी आहे? शरीरात नेमकं काय घडत आहे? त्याचबरोबर शरीराला काय हवे आहे? याबद्दल जाणून घेऊ शकतो.
आपण नेहमी आपल्या नखांवर सफेद डाग पाहिले असतील. कधी कधी नखांवर उभ्या रेषा उमटतात तर कधी कधी अवाढव्य पांढऱ्या रंगाच्या रेषा उमटताना दिसतात. कधी कधी आपली नखं पिवळ्या रंगाचे दिसून येतात. नखांच्या या बदलत्या रुपाला बरीच कारणे असतात. नखांची ही बदलती रूपे आपल्या शरीराविषयी काही संकेत देतं असतात. या संकेतांना वेळीच ओळखून त्यावर उपाय करून आपण आपले आरोग्य चांगले टिकवून ठेवू शकतो. चला तर मग जाणूया, आपली नखे आपल्याला कसे संकेत देतात.
हे देखील वाचा : ‘या’ सर्वसामान्य चुकांमुळे प्रेशर कुकर होतो ब्लास्ट! वेळीच रहा जाणकार
जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर समजून जा कि तुमच्या शरीरामध्ये आयरनची कमी आहे. शरीरात आयरन कमी असताना नखांच्या कोपऱ्यातही चीर पडते. शरीरातील आयरन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या, डाळ तसेच काळे किशमिश खाल्ले पाहिजेत. त्याचबरोबर, बऱ्याच जणांच्या नखांवर सफेद रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. हे डाग अनेक गोष्टी सांगत असतात.नखांची ही समस्या अतिशय सामान्य असते. जर तुमच्या नखांमध्ये सफेद रंगाचे डाग दिसून येत आहेत याचा अर्थ कि तुमच्या शरीरामध्ये जिंकची कमतरता आहे. या समस्येपासून दूर होण्यासाठी सेवनात चणे, सूर्यफुलाचे बिया, ओट्स, काजू तसेच डाळींचा समावेश करावा.
नखांच्या वरील भागात पिवळसरपण येणे म्हणजे प्रोटीनची कमतरता असणे. यासाठी अंडे, दूध तसेच नट्सचे सेवन उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर जर संपूर्ण नखाचा रंग पिवळा झाला असेल तर ते कावीळ असू शकते किंवा फंगल इन्फेक्शन असू शकते. फॅनगल इन्फेक्शन असल्यास पाण्यामध्ये एप्पल साइडर विनेगर मिसळून त्यात अर्ध्या तासासाठी बोट बुडवून ठेवावीत आणि नंतर पुसून घ्यावीत.