शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्राव झाल्याने गेला मुलीचा जीव
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना आता समोर आलीये. एका नर्सिंग विद्यार्थिनीचा शारीरिक संबंधादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. पोलीस तपासात असे समोर आले आहे की विद्यार्थिनीला जास्त रक्तस्त्राव होत असतानाही तिचा 26 वर्षीय प्रियकर तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तासनतास फोनवर या समस्येवर घरगुती उपाय शोधत राहिला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून यावर आता सगळीकडे चर्चा चालू झाली आहे. दरम्यान शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्राव झाल्यानंतर त्वरीत डॉक्टरांकडे जाणं किती गरजेचे आणि आवश्यक आहे याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया. त्याआधी नेमकं प्रकरण काय हेदेखील जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे नेमके प्रकरण
शारीरिक संबंध ठेवताना काय घ्यावी काळजी
पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली की आरोपी तरुणाने इंटरनेटवर ‘शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग’ हा विषय शोधण्यात बराच वेळ वाया घालवला होता. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांशी संपर्क साधला आणि पीडितेला खासगी वाहनातून रुग्णालयात त्याने नेले. मात्र त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. नवसारीचे SP सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, ‘फॉरेन्सिक अहवालानुसार विद्यार्थिनीचा मृत्यू हा जास्त रक्तस्त्रावामुळे झाला आहे. तिला वेळीच तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचे प्राण वाचू शकले असते.’
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय सांगितले?
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे तिला जास्त रक्तस्त्राव झाला आणि शेवटी रक्तस्त्रावाच्या शॉकमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंधादरम्यान विद्यार्थिनीला रक्तस्त्राव होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आल्यानंतरही त्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी हॉटेलमध्ये जवळपास 60 ते 90 मिनिटे घालवली. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विद्यार्थिनीला मृत घोषित केले.
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव का होतो?
रक्तस्राव होण्याची कारणे काय आहेत
शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव अनेक कारणांमुळे होऊ शकतो, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी काही कारणे सांगितली आहेत, आपण जाणून घेऊया
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
अशा परिस्थितीत काय करावे?
कोणती आणि कशा पद्धतीने काळजी घ्यावी
संभोगादरम्यान रक्तस्त्राव होत असल्यास, या उपायांचा अवलंब करा
शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव होणे एक गंभीर समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे हे जीवावर बेतू शकते. तुम्हाला अशी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय सुरक्षित शारीरिक संबंध राहतील याची काळजी घ्या आणि आरोग्याची नियमित तपासणी करा