PCOS समजण्यासाठी कोणत्या रक्तचाचण्या कराव्या
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) समजून घेणे हा महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत: घेण्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम करण्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पाच महत्त्वाच्या रक्तचाचण्या पीसीओएसचे निदान करणे आणि ते हाताळणे, ही स्थिती निश्चित करणार्या क्लिष्ट हार्मोनल असंतुलनांवर लक्ष घालणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. न्युबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे कार्यकारी संचालक, डॉ. अजय शाह यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.
अॅंड्रोजेनच्या पातळ्या
पीसीओएसमधील होणारा त्रास
अॅंड्रोजन्सच्या वाढलेल्या पातळ्या ज्यांना सर्वसाधारणपणे पुरूषांचे हार्मोन्स म्हणून संबोधले जाते हे पीसीओएस ओळखण्याचे महत्त्वाचे घटक असतात. रक्तातील अॅंड्रोजेनच्या पातळ्या मोजल्याने आरोग्यसेवा प्रदात्यांना हार्मोनल असंतुलन दाखवून देण्यास मदत करतात जे मुरूमे, चेहर्यावर किंवा शरीरावर अतिरिक्त प्रमाणातील केस आणि मासिक पाळीचे अनियमित चक्र ही लक्षणे अधोरेखित करतात.
इन्शुलिन प्रतिकार
इन्शुलीन प्रतिकार हे पीसीओएसचे सर्वसाधारण वैशिष्ट्य आहे आणि ते त्याची गंभीरता अधिक वाढवू शकते. इन्शुलिनच्या पातळ्या आणि ग्लुकोज संह्यता तपासणार्या रक्तचाचण्या शरीर इन्शुलिनला कशारीतीने प्रतिसाद देतात ते दाखवतात. इन्शुलिन प्रतिकार सुरूवातीच्या टप्यांमध्ये ओळखल्याने जीवनशैलीतील बदल आणि उपचारांचे पर्याय यांबद्दल मार्गदर्शक ठरू शकतात.
हेदेखील वाचा – ‘पीसीओएस’मुळे मानसिक आरोग्यावर ताण येतोय ? मग ‘ही’ बातमी वाचाच
पितपिंडकारी संप्रेरक (ल्युटेनायझिंग हार्मोन-एलएच) चे कूप-उत्प्रेरी संप्रेरक
रक्तचाचणी करणे आवश्यक आहे
(फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन- एफएसएच) सोबत असलेले गुणोत्तर हे सर्वसाधारणपणे पीसीओएसमध्ये पाहिले जाते. या असंतुलनामुळे ओव्ह्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि वंध्यत्वासाठी कारक ठरू शकते. रक्तचाचण्यांच्या माध्यमातून या गुणोत्तरावर लक्ष ठेवल्यामुळे पीसीओएसचे निदान आणि त्याचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरू शकते.
लिंग संप्रेरक-संयुगी ग्लोब्युलिन (सेक्स हार्मोन-बाइंडिंग ग्लोब्युलिन-एसएचबीजी)
एसएचबीजी हे एक असे प्रथिन आहे जे रक्तातील लिंग संप्रेरकाला बंधित करते. एसएचबीजीच्या निम्न पातळ्या म्हणजे पीसीओएसमधील अॅंड्रोजेनच्या वाढलेल्या पातळ्यांशी संबंधित आहेत. एसएचबीजी पातळ्यांचे मापन केल्याने हार्मोनचा गुणधर्म आणि उपचारांबाबतचे निर्णय घेण्याबाबत मदत होते.
हेदेखील वाचा – PCOS पासून आराम हवाय? तर आहारात करा बदल
अॅंटी-म्युलेरिअन हार्मोन (एएमएच)
पीसीओएसचे सुरूवातीच्या टप्यातील निदान आणि व्यवस्थापन
एएमएच हा लहान अंडकोशीय पटलाद्वारे निर्माण केला जातो. पीसीओएसमध्ये एएमएचच्या पातळ्या वाढलेल्या दिसतात आणि परिपक्व न झालेल्या कूपांची संख्या वाढलेली दिसून येते. एएमएच चाचणी केल्याने पीसीओएसचे निदान करण्यात आणि अंडाशयाचे कार्य तपासण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
या 5 रक्तचाचण्या पीसीओएसचे सुरूवातीच्या टप्यातील निदान आणि व्यवस्थापनामध्ये उपयुक्त ठरणारी बहुमूल्य साधने आहेत. ते हार्मोनमधील असंतुलनाबाबत स्पष्ट पुरावे देतात ज्यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचार्यांना आणि व्यक्तींना उपचारांचे पर्याय, जीवनशैलीतील बदल आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाबाबत सशक्त निर्णय घेण्यास मदत करतात. या चाचण्यांचे सामर्थ्य जाणून घेऊन आपण महिलांना त्यांच्या उत्तम आरोग्य आणि सकारात्मक भविष्याकडे वाटचाल करण्यास सक्षम करू शकू.