सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेवर RBI ने मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने पीएनबीला 1.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसीशी संबंधित नियम आणि ‘कर्ज आणि ॲडव्हान्स’शी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने PNB वर ही कारवाई केली आहे. RBI ने पंजाब नॅशनल बँकेची 31 मार्च 2022 पर्यंतच्या आर्थिक स्थिती काय आहे याबाबत तपासणी केली होती. यानंतर आरबीआयने बँकेला याप्रकरणी नोटीसही पाठवली होती.
बँकेवर दंड का ठोठावण्यात आला आहे ?
रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत असे समोर आले आहे की, पीएनबीने सबसिडी, रिफंड आणि रिइम्बर्समेंटद्वारे सरकारकडून मिळालेल्या रकमेच्या बदल्यात कॉर्पोरेशनला वर्किंग कॅपिटल डिमांड कर्ज दिले होते. तसेच PNB त्याच्या काही खात्यांमध्ये ग्राहकांचे डिटेल्स आणि पत्ता याची माहिती ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामूळे ग्राहकांच्या KYC डिटेल्स ची माहिती न ठेवल्यामुळे बँकेला दंड आकारण्यात आला आहे. RBI ने PNB ला एकूण 1.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ?
पंजाब नॅशनल बँकेवर कारवाई करताना रिझर्व्ह बँकेने नियम न पाळल्यामुळे दंड आकारला आहे. तसेच बँकेच्या अंतर्गत कामकाजात रिझर्व्ह बँक कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा दंड आकारला असला तरी ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला आहे.
मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार पीएनबी बँकेची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. यामुळे 5 जुलै 2024 पासून बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेत 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ग्राहकांना DICGC अंतर्गत 100 टक्के रक्कम मिळेल. RBI ने माहिती दिली आहे की बँकेच्या 99.96 टक्के ग्राहकांना त्यांची संपूर्ण रक्कम DICGC मार्फत मिळेल.