देशाच्या राजधानीतून एक मोठी बातमी येत आहे. दिल्लीतील प्रसिद्ध तिहार तुरुंगात शुक्रवारी दोम कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. बघता बघता हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. या झटापटीत एका कैद्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत कैदी हा तुरुंगात नोकराचं काम करतो. कारागृह प्रशासनाने एकाच्या मृत्यूला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
[read_also content=”उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; खोल दरीत कार पडून पाच जणांचा मृत्यू, एक जखमी https://www.navarashtra.com/india/vehicle-fell-into-a-deep-ditch-on-mussoorie-dehradun-road-five-people-died-nrps-529507.html”
शुक्रवारी दुपारी तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 3 मध्ये काही मुद्द्यावरून कैद्यांमध्ये वाद झाला. कैद्यांमधील भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादात एका कैद्याचा मृत्यू झाला.
तुरुंग अधिकाऱ्यांनी हिंसक चकमकीला दुजोरा दिला आहे. दोन कैद्यांमधील वादाला हिंसक वळण लागल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने सांगितले.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. मात्र तो तुरुंग क्रमांक 1 मध्ये आहे तर तुरुंग क्रमांक 3 मध्ये हिंसाचार झाला. केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती.