भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन FIR दाखल करण्यात आले आहेत.मात्र ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती.
आंदोलन केल्याप्रकरणी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या तिघांविरोधात दिल्ली पोलिसांना गुन्हा दाखल केले आहेत. याशिवाय कुस्तीपटून मोठ्या कष्टाने जिंकलेले मेडल्सही गंगेत विसर्जित करण्याचा इशारा दिला आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना देखील खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
आता दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती समोर आली आहे. या एफआयआरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर शरीरसुखाची मागणी, चुकीच्या पद्धतीने स्पर्श, तसेच इतरही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर नेमके काय आरोप आहेत?
7 पैलवानांनी 21 एप्रिल रोजी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचे दोन गुन्हे दाखल केले. पहिली एफआयआर अल्पवयीन पीडितेने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांशी संबंधित आहे.
दुसरी एफआयआर अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवर आधारित आहे आणि त्यात POCSO कायद्याच्या कलम 10 चीही नोंद आहे. यामध्ये प्रकरणात दोषी ठरल्यास आरोपीला पाच ते सात वर्षांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या 2012 ते 2022 या कालावधीत भारतात आणि परदेशात घडल्या आहेत.
अल्पवयीन पीडितेने काय म्हटलेले आहे?
आरोपीने घट्ट पकडले, फोटो काढण्याचा बहाणा केला आणि त्याच्याकडे ओढले, आरोपीने खांदा जोरात दाबला आणि नंतर मुद्दाम चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श केला. पीडितेने स्पष्टपणे सांगितले होते की, पाठलाग करू नये, तरीही हे प्रकार केले गेले, असे पीडितेच्या बाजूने स्पष्ट करण्यात आले.
6 महिला कुस्तीपटूंनी तक्रारीत कोणते आरोप केले आहेत?
पहिली तक्रार- हॉटेलमधील रेस्तराँमध्ये जेवताना मला त्याच्या टेबलावर बोलावले, मला स्पर्श केला. छातीपासून पोटापर्यंत स्पर्श केला. माझ्या परवानगीशिवाय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात माझ्या परवानगीशिवाय गुडघे, खांदे आणि तळवे यांना स्पर्श केला. पायांनी माझ्या पायांना स्पर्श केला. माझ्या श्वासोच्छवासाची पद्धत समजून घेण्याच्या बहाण्याने छातीपासून पोटापर्यंत स्पर्श केला.
दुसरी तक्रार- मी चटईवर झोपलेले असताना आरोपी (ब्रिजभूषण सिंह) माझ्याकडे आला. माझे प्रशिक्षक त्यावेळी तिथे नव्हते. माझ्या परवानगीशिवाय माझा टी-शर्ट ओढला आणि माझ्या छातीवर हात ठेवून माझा श्वास तपासण्याच्या बहाण्याने पोटाच्या खाली सरकावला. मी माझ्या भावासोबत फेडरेशनच्या कार्यालयात होते, त्यावेळी मला बोलावण्यात आले आणि माझ्या भावाला बाहेर थांबण्यास सांगितले, त्यानंतर मला खोलीत ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
तिसरी तक्रार- त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नसल्याने त्याने मला माझ्या पालकांशी फोनवर बोलण्यास सांगितले. आरोपीने (सिंह) मला त्याच्या बेडवर बोलावले जेथे तो बसला होता आणि नंतर अचानक माझ्या परवानगीशिवाय त्याने मला मिठी मारली. त्याची शरीरसुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मला सप्लिमेंट्स विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून लाच देण्याचाही प्रयत्न केला.
चौथी तक्रार – ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मला बोलावून माझा टी-शर्ट ओढून माझ्या पोटाखाली हात सरकवला. माझा श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्याने माझ्या नाभीवर हात ठेवला.
5वी तक्रार- मी रांगेत सर्वात शेवटी होते, त्यावेळी आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी दूर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझा खांदा पकडला.
सहावी तक्रार- फोटो काढण्याच्या बहाण्याने आरोपीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याला मी विरोध केला.