मणिपूरमधे कुकी दहशतवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, दोन जवान शहीद

कुकी दहशतवाद्यांनी मणिपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला (Attack In Manipur) केला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.

    मणिपूर :  सध्या देशात लोकसभा निवडणूक (Lok sabha Election 2024) सुरू आहे. शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं तर अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचही पाहायला मिळालं. या निवडणुकीच्या धामधुमीत मणिपूरमध्ये हिंसक घटना  घडली आहे. कुकी दहशतवाद्यांनी  मणिपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला (Attack In Manipur) केला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. पहाटे दोनच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

    मणिपूरमधील हिंसाचार संपवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मणिपुरात मैतेई आणि कुकी समाजात असेलेला वाद सर्वपरिचीत आहे. ज्यामुळे कित्येक दिवसापासून मणिपूर हिंसांचाराच्या आगीत जळत आहे. हा भाग संवेदनशील असल्यामुळे निवडणूक काळात विशेष काळजी घेतली जात आहे. पण काल रात्री उशीरा मणिपूरमध्ये कुकी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या छावणीवर गोळीबार करून हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.