बालासोर- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात बहनागा स्टेशनच्या जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेची तीव्रता शनिवारी आकाश फटफटू लागल्यानंतर समोर आली. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला, त्यानंतर त्याच्या बाबतच्या बातम्या या तुकड्या तुकड्यांत येत होत्या. शुक्रवारी रात्री अपघाताच्या ठिकाणी अंधार असल्यानं नेमकं घडलंय काय, हेच समजत नव्हतं. अपघात दोन रेल्वेंमध्ये झालाय, तीन रेल्वेंचा आहे, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होत नव्हतं. शनिवारी पहाटे उजाडलं आणि या अपघाताची तीव्रता किती भयंकर आहे हे समोर आलं.
रात्री उशिरापर्यंत कोरोमंडल एक्सप्रेस आणि एका मालगाडीची टक्कर झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर हावडा एक्सप्रेसशी या कोरोमंडल एक्सप्रेसची धडक झाल्याचं सांगण्यात आलं. रात्री उशिरा तीन रेल्वेंचा अपघात झालाय, हे स्पष्ट झालं. त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन हादरलं. अपघाताचे फोटो समोर येऊ लागल्यानंतर हा अपघात भयंकर स्वरुपाचा आहे, हे स्पष्ट होऊ लागलं होतं. सुरुवातीला मृतांचा आकडा 50, 70 असा होता. मध्यरात्रीपर्यंत तो 120 वर पोहचला आणि पहाट झाली तेव्हा तो आकडा 237 वर जाऊन पोहचलाय. सध्याच्या आकडेवारीनुसार 900 हून अधिक जणं जखमी आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनीच ही माहिती दिलीय.
#WATCH | “Our 6 teams are working here since last night. Our dog squad, and medical team are also engaged in the rescue operation,” says Jacob Kispotta, Senior Commandant, NDRF#BalasoreTrainAccident pic.twitter.com/Sjuep3ZLeq
— ANI (@ANI) June 3, 2023
शुक्रवारी रात्रभर या परिसरात बचाव कार्य सुरु होतं. सैन्यदलाला यासाठी पाचारण करण्यात आलं. बहनागा बाजार स्टेशनचा हा परिसर रात्रभर किंकाळ्यांनी जागता राहिला. आरडा ओरड होत राहिली. रेल्वेच्या डब्यांमध्ये अनेक मृतदेह अडकले आहेत, हे स्पष्ट झालं. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक एसी कोच समोरच्या रेल्वे रुळांवर पडले आहेत. त्यात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. एनडीआरएफच्या टीमला रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना विलग करताना गॅस कटरचा उपयोग करावा लागला. अनेक जखमी जिंवत अवस्थएत अनेक डब्यांमध्ये अडकून प़डलेले होते. अपघात इतका भीषण होता की डबे एकमेकांच्या वर चढलेले आहेत.
#WATCH | “We are continuously engaged (in rescue operations) since last night. More columns (of army) are coming from Kolkata,” says Colonel SK Dutta, Indian Army #OdishaTrainAccident pic.twitter.com/SEXzxsonv2
— ANI (@ANI) June 3, 2023
या अपघातात 237 जण मृत झाले आहेत तर 900 जण जखमी झाले आहेत. या जखमींना अपघाताच्या ठिकाणावरुन तातडीनं जवळच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलंय. कटकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अलर्टची स्थिती आहे. या अपघातातील जखमींना रक्तदानासाठीही आवाहन करण्यात येतंय.
Odisha | People queue up in #Balasore to donate blood after the horrific train accident in Balasore yesterday.
As per officials, as of now 233 people have died and around 900 are injured. pic.twitter.com/3o9mGU0xov
— ANI (@ANI) June 3, 2023