एकाच तुरुंगातील 36 कैदी आढळले एचआयव्ही पॅाझिटिव्ह, तुरुंग प्रशासनाला फुटला घाम!

किमान 36 कैद्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली. या दरम्यान, मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले.

    लखनौ : जगभरात एड्स (AIDS) या आजारविषयी जनजागृती करण्यात येते. एचआयव्हीची लागण होण्यापासून टाळण्यासाठी अनेक उपाय सध्या उपलब्ध आहेत. असं असुनही मात्र उत्तरप्रदेशच्या लखनौ येथील कारागृहात तब्बल 36 कैदी एचआयव्ही पॅाझिटिव्ह (HIV Positive) आढल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सध्या कारागृह प्रशासनाची झोप उडाली आहे.
    आरोग्य अहवालानुसार, डिसेंबर २०२३ मध्ये लखनौ जिल्हा कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किमान 36 कैद्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली. या दरम्यान, मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. आता लखनौ तुरुंगातील एकूण एचआयव्ही बाधितांची संख्या ६३ झाली आहे.