पूंछ : जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पूंछमध्ये लष्कराच्या एका वाहनाला अचानक आग लागली. या आगीत चार जवान शहीद (Indian Army Soldier) झाले आहेत. भाटा धुरियन भागातील महामार्गावर ही घटना घडली. या दुर्घटनेबद्दल लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज कोसळून गाडीनं पेट घेतला आणि हा अपघात झाला. जवानांना काही कळण्याच्या आतच वाहन आगीत जळून खाक झाले. त्यात चार जवान शहीद झाल्याची माहिती दिली जात आहे.
Casualties feared as an Indian Army truck catches fire in Poonch district of Jammu & Kashmir
Details awaited. pic.twitter.com/QgVwYQIZQ4
— ANI (@ANI) April 20, 2023
पूंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या अपघातात चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचे दिसत आहे. पूंछ जिल्ह्यापासून 90 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. त्यावेळी पाऊसही सुरू होता. आगीची माहिती मिळताच स्थानिक लोक तिथे धावले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
बचावकार्य सुरु
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्करातील जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून, लष्कराच्या वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरू आहे.