देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं (Corona Update India) डोकं वर काढल्याचं दिसत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान इथं कोरोनाचे रुग्ण आढळले. आता दिवसागणिक देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.
[read_also content=”प्रभासचा ‘सालार’ बॅाक्स ऑफिसवर सुसाट, सातव्या दिवशी कमावले 13.50 कोटी! https://www.navarashtra.com/movies/salaar-box-office-collection-day-7-is-13-50-nrps-493293.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसाप देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,091 वर आली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळमधील 2, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 5,33,351 वर पोहोचली आहे.
तर, देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.