तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पॅसेंजर ट्रेनला आग (Tamilnadu Train Fire) लागून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांनी डब्यात गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे आणले होते, त्याचा स्फोट झाल्याने ही आग लागली. यामुळे काही प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला.
[read_also content=”23 ऑगस्ट ‘नॅशनल स्पेस डे’ साजरा होणार, विक्रम लँडर उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव; चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचलं त्याला ‘तिरंगा’ नावाने ओळखणार, पंतप्रधानांकडून घोषणा https://www.navarashtra.com/india/august-twenty-three-national-space-day-will-be-celebrated-the-place-where-vikram-lander-landed-will-be-named-shiva-shakti-announced-by-the-pm-449747.html”]
दक्षिण रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मदुराई रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला ही भीषण आग लागली. कोचीवरुन तामिळनाडुच्या दिशेनं जाणाऱ्या “पुनालुर-मदुराई एक्स्प्रेसला आज पहाटे 5:15 वाजता मदुराई यार्ड येथे आग लागली. यावेळी अग्निशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, यामध्ये आठ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १६७३० (मदुराई-पुनालुर एक्सप्रेस) मध्ये लखनौहून 65 प्रवाशांना घेऊन एक खासगी पार्टी ट्रेनच्या टुरिस्ट कोचमध्ये चढली. आज पहाटे ३.४७ वाजता मदुराईला पोहोचली. यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशांनी एलपीजी सिलिंडर सोबत आणले होते. सकाळच्या सुमारास त्यांनी चहा/नाश्ता तयार करण्यासाठी सिलिंडरचा वापर सुरू केला. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन कोचला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच बहुतांश प्रवासी डब्यातून बाहेर पडले. त्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवण्यात आली. या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात येत असून दक्षिण रेल्वेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मृतांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल.
या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून ज्यामध्ये डब्याला भीषण आग लागल्याचे आणि काही लोक आजूबाजूला ओरडत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान शेजारील रेल्वे रुळावरून एक ट्रेनही जात आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यादरम्यान ट्रेनचा डबा जळालेला दिसत आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेतले होते, त्यामुळे आग लागली. रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे डब्यात कोणतीही ज्वलनशील सामग्री घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ज्या डब्यात आग लागली तो खासगी कोच होती.