
'आप' हा घोटाळ्याचा जनक पक्ष आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा नारा देत हा पक्ष सत्तेवर आला. पण आता तोच भ्रष्टाचाराच्या गर्तेत आहे. कोणत्याही पक्षाचे बडे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने तुरुंगात जात असतील, तर हा पक्ष कोणते ध्येय घेऊन सत्तेत आला आहे, याचा विचार जनतेने करायला हवा', असे आवाहन हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केले.
चंदीगड : ‘आप’ हा घोटाळ्याचा जनक पक्ष आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा नारा देत हा पक्ष सत्तेवर आला. पण आता तोच भ्रष्टाचाराच्या गर्तेत आहे. कोणत्याही पक्षाचे बडे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने तुरुंगात जात असतील, तर हा पक्ष कोणते ध्येय घेऊन सत्तेत आला आहे, याचा विचार जनतेने करायला हवा’, असे आवाहन हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केले.
आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना सतत तुरुंगात टाकल्याचा खरपूस समाचार अनिल विज यांनी घेतला. ते म्हणाले, ‘आप’ सतत आरोप करत आहे की, त्यांच्या नेत्यांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले जात आहे. पण, कोर्टात तुम्हाला रिमांड का देण्यात आला? गत 7-8 महिन्यांपासून कोर्ट तुमचा जामीन अर्ज फेटाळत आहे, तुमचा देशातील कोणत्याही यंत्रणेवर विश्वास नाही का ? न्यायालय चुकीचे आहे आणि न्यायालय तुम्हाला छळत आहे, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे.
दरम्यान, देशात भीतीचे वातावरण असल्याच्या केजरीवाल यांच्या विधानाला उत्तर देताना वीज म्हणाले, मेगा घोटाळ्याचे जनक तेच आहेत.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले प्रत्युत्तर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बिहारच्या धर्तीवर राजस्थानमध्ये जात जनगणना करण्याच्या घोषणेला प्रत्युत्तर देत गृहमंत्री विज म्हणाले, विरोधक देशाला एकत्र करण्याऐवजी वेगवेगळ्या भागात विभागण्याचा दुष्ट प्रयत्न करत आहे. हा सगळा निवडणुकीचा खेळ आहे. जे काही पक्ष जात गणनेचा पुरस्कार करत आहेत, त्यांनी सत्तेत असताना या जातींसाठी काय केले, ते आधी सांगावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.