Maharashtra Legislative Council Elections 2026 : महाविकास आघाडीतला तणाव चर्चेनंतर अखेर निवळला
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेतील रिक्त जागांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आता निवडणुकीसाठी आवश्यक अट पूर्ण झाली आहे.
नियमानुसार, एखाद्या मतदारसंघात एकूण मतदारसंख्येच्या किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असणे आवश्यक असते. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ असून त्यापैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून निवडून येतात. सध्या त्यातील १७ जागा रिक्त आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम विधान परिषदेतील सत्तासमीकरणांवर होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास विधान परिषदेतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक होणारे मतदारसंघ
अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, संभाजीनगर-जालना, नागपूर.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर राज ठाकरेंची टीका
इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट आणि वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना एक मोठे आवाहन केले आहे. देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी आपण पेट्रोल-डिझेलचा वापर संयमाने केला पाहिजे आणि ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांना पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे, असे विधान पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.






