फोटो सौजन्य: Pinterest
त्यावेळी बुद्धांच्या एका शिष्याला याचं फार वाईट वाटलं. तो पुढे आला आणि बुद्धांना म्हणाला की , तो माणूस वाट्टेल ते बोलून गेला तरी तुम्ही त्याला काहीच बोलले नाही असं का केलतं तुम्ही. त्यावर बुद्ध म्हणाले की, कोणी आपल्याला भेटवस्तू दिली दिली आणि आपण तिचा स्विकार केला नाही तर ती भेटवस्तू कोणाच्या मालकीची होते ? शिष्य म्हणाला जी व्यक्ती देत आहे तिच्या. यावर बुद्ध म्हणाले तो माणूस रागात वाट्टेल बोलला पण मी त्याचा राग स्विकार केला नाही त्यामुळे तो जे काही म्हणाला ते त्यालाच लागू होतं. आपल्या अवती भवती खूप माणसं अशी असतात जे समजण्याच्या पलिकडे असतात.
Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ
त्यामुळे त्यांना उलट उत्तरं देण्यात किंवा त्यांचं बोलणं मनाला लावून घेण्यात आपण आपला वेळ वाया घालवू नये, असं बुद्ध म्हणतात. तात्पर्य काय तर शांत राहणं कमीपणा नाही तर सर्वात मोठी ताकद आहे. वेळ ही सर्वात अमुल्य गोष्ट आहे त्यामुळे चुकीच्या माणसांसाठी तो वाया घालवू नये.
काही माणसं सतत आपल्याला राग येईल असं वागतात विनाकारण त्रास देतात आणि या सगळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्यालाच. रागाचा उद्रेक होऊन आपल्या शरीरावर आणि मनावर याचा परिणाम होतो. खरंतर परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. पण हे शांत राहणं कमीपणा नाही तर सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा एखादा व्यक्ती मनाविरुद्ध घडत असाताना देखील शांत राहतो त्यावेळी त्याची सहनशक्ती ही सर्वात जास्त वाढलेलाी असते त्यामुळे शांत राहणं कमीपणा नव्हे तर सर्वात मोठी ताकद असते असं गौतम बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे.






