Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anna Hazare Statement: ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”

आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष नीट चालला असता तर कोणीही सोडून गेले नसते, असे अण्णांनी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 09:04 PM
'आप'मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

'आप'मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
  • म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”
  • ‘आप’साठी अस्तित्वाची लढाई
Anna Hazare Statement on AAP MPs Resignation: आम आदमी पार्टीच्या (AAP) गोटात शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, या तिघांसोबतच इतर चार बड्या खासदारांनीही राजीनामा दिल्याने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकाच वेळी ७ बड्या नेत्यांची एक्झिट

पत्रकार परिषदेत माहिती देताना राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यासोबत या मोहिमेत इतर चार खासदारही सामील आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंह साहनी आणि स्वाती मालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे. एकाच वेळी सात राज्यसभा खासदारांनी साथ सोडल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, आम आदमी पार्टीच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“दोष पक्ष आणि संघटनेचाच”; अण्णा हजारेंचा घणाघात

या संपूर्ण राजकीय नाट्यावर बोलताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अण्णा हजारे म्हणाले, “लोकशाहीमध्ये कोठे जायचे आणि कोठे राहायचे, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. त्यामुळे कोणावरही सक्ती करणे अयोग्य आहे. जर त्यांना लोकशाही व्यवस्थेत काही अडचणी आल्या असतील, तर कदाचित याच कारणामुळे त्यांनी पक्ष सोडला असावा. यामागे काहीतरी मूळ कारण नक्कीच असणार. लोकशाहीमध्ये, त्यांना जिथे हवे तिथे जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. यात दोष पक्षाचा आणि संघटनेचा आहे. जर पक्षाचे कामकाज योग्य रितीने चालले असते, तर त्यांनी पक्ष सोडला नसता.”

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो

स्वार्थामुळे तत्त्वांना हरताळ

ज्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून हा पक्ष जन्माला आला, तोच आज विखुरत आहे, या प्रश्नावर अण्णांनी मार्मिक भाष्य केले. “जेव्हा वैयक्तिक स्वार्थ वरचढ ठरतो, तेव्हा माणसे आणि संघटना तुटतात. जर देश आणि समाजहित डोळ्यांसमोर ठेवले असते, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. दुर्दैवाने, आज लोक समाज आणि देशाला विसरून केवळ सत्ता आणि पैशाच्या मागे धावत आहेत. या सत्तेच्या हव्यासामुळेच सर्व काही विस्कळीत झाले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

‘आप’साठी अस्तित्वाची लढाई

राज्यसभेतील संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घटल्याने आणि महत्त्वाचे चेहरे भाजपच्या वाटेवर असल्याने आम आदमी पार्टी आता बॅकफूटवर आली आहे. अण्णा हजारेंच्या या वक्तव्यामुळे पक्षाच्या नैतिक अधिष्ठानावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनातील नैतिकता सोडून ‘आप’ आता केवळ सत्तेचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Arvind Kejriwal : ‘भाजपने पुन्हा एकदा…’, 7 खासदार फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Aap political crisis 7 mps resign anna hazare reaction raghav chadha bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • AAP
  • Anna Hazare
  • arvind kejariwal
  • BJP

संबंधित बातम्या

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
1

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
2

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; ‘उपोषण समाजासाठी, देशासाठी असलं पाहिजे’, दिला महत्त्वाचा सल्ला
3

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; ‘उपोषण समाजासाठी, देशासाठी असलं पाहिजे’, दिला महत्त्वाचा सल्ला

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?
4

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.