उत्तर प्रदेशात भीषण अपघात; ट्रक-कारच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू, भरधाव ट्रक...
बाराबंकी : उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला. बाराबंकी येथील देवा फतेहपूर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान दोघांचा ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला. कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये दोन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.
बिथूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहपूर शहरातील मौलवीगंज येथील रहिवासी प्रदीप रस्तोगी (वय ५५) हे त्यांच्या कुटुंबासह कानपूरमधील बिथूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजप नेते गिरधर गोपाल यांच्या नवीन, नंबर नसलेल्या एर्टिगा कारमधून जात होते. त्या संध्याकाळी परत येत असताना त्यांची कार कल्याणी नदीच्या पुलाजवळ येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकला धडकली.
हेदेखील वाचा : पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
दरम्यान, या अपघातात प्रदीप रस्तोगी, त्यांची पत्नी माधुरी रस्तोगी (वय ५२), मुलगा नितीन (वय ३५), मुलगा कृष्णा (वय १५), चालक श्रीकांत (वय ४०) आणि महेंद्र मिश्रा उर्फ बाला (वय ४५), मोहम्मदपूर खाला पोलिस स्टेशन परिसरातील खादेहरा गावातील रहिवासी यांचा मृत्यू झाला. इंद्रकुमार मिश्रा (वय ५०) आणि विष्णू नाग (वय १५) यांचा रात्री केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे अपघातांतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हे आठही जण एकाच कारमध्ये प्रवास करत होते.
भरधाव ट्रक असल्याने ब्रेक लावण्यात अडचण
ट्रक इतक्या वेगाने जात होता की, चालकाला ब्रेकही लावता आला नाही. धडकेनंतर ट्रक काही अंतरापर्यंत ओढला गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरू आहे. यातील मृतांची ओळख पटली असून, त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral






