इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई! ‘नो फ्लाय’ यादीत समावेश करण्याची शक्यता

इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई करण्यात येणार आहे. हा राडा करणाऱ्या प्रवाशाला 'नो-फ्लाय' (No Fly) यादीत टाकण्यासाठी DGCA कडे शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

  इंडिगो विमानाच्या पायलटला प्रवाशाने मारहाण (Passenger Hits Pilot) केल्याचं प्रकरण सध्य खुप चर्चेत आहे. मात्र, अशा पद्धतीने पायलटला मारहाण करणं प्रवाशांला चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी इंडिगो एअरलाइन कंपनी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. हा राडा करणाऱ्या प्रवाशाला ‘नो-फ्लाय’  (No Fly)  यादीत टाकण्यासाठी DGCA कडे शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबाबत अंतर्गत समिती स्थापन केली आहे. जर एखाद्या प्रवाशाचे नाव ‘नो फ्लाय लिस्ट’मध्येदिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला अनुचित वर्तनासाठी दोषी मानून विशिष्ट कालावधीसाठी भारतात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  इंडिगो विमानाला उशीर झाल्याची घोषणा करणाऱ्या एका वैमानिकाला प्रवाशाने मारहाण केली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक तासांच्या विलंबानंतर फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे पूर्वीच्या क्रूची जागा एका जागा वैमानिकाने घेतली. मात्र, काही कारणामुळे फ्लाईट उशीरानं धावत असल्याची माहिती देण्यासाठी तो प्रवाशांसमोर आला. तितक्यात पिवळा हुडी घातलेला एक माणूस अचानक धावत आला  आणि त्याने पायलटवर हल्ला करत त्याल मारहाण केली. वेळीच उपस्थित असलेल्या इतर क्रु मेंबर्सनी त्या प्रवाशाला रोखलं. या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना रविवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

  प्रवाशावर होणार कारवाई

  रविवारी दिल्ली विमानतळावर खराब हवामानामुळे 110 उड्डाणे उशीर झाली आणि 79 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दिल्लीहून गोव्याला जाणारे इंडिगोचे विमानाला 6E-2175 काल धुक्यामुळे सुमारे 12 तास उशीर झाला होता. विमानाला उशीर झाल्याची घोषणा करताना एका प्रवाशाने पायलटला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी प्रवाशावर कारवाई करण्यात आली आहे.  इंडिगोने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्याविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. त्याच नाव ‘नो-फ्लाय’ यादीत टाकण्यासाठी DGCA कडे शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

  ‘नो फ्लाय लिस्ट’ म्हणजे काय?

  एखाद्या प्रवाशाला ‘नो-फ्लाय’ यादीत टाकणे म्हणजे  ‘नो फ्लाय लिस्ट’मधून नाव काढून टाकल्यानंतर तो देशातील कोणत्याही विमान कंपनीने विमानाने प्रवास करू शकत नाही.