यावल तालुक्यातील चारमाळी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या पाड्यावर हर घर जल योजनेअंतर्गत 61 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र योजनेचे काम पूर्ण न झाल्याने पाणीटंचाई कायम आहे. पाणी आणण्यासाठी आदिवासी महिलांना मोठा डोंगर पार करावा लागत आहे. तप्त उन्हात दोन ते तीन किलोमीटर पायपीट या महिलांना करावी लागत असून जीवघेणी कसरत या ठिकाणी सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी व या पाड्यावर तात्काळ टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.